शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

मॅरेथॉन स्पर्धेत ‘लक्ष्य’ अकादमीचे वर्चस्व

By admin | Updated: March 16, 2017 01:56 IST

येथील ग्रामदैवत श्रीकाळभैरवनाथ यात्रेनिमित्त आयोजित मॅरेथॉन स्पर्धेत लक्ष्य अकादमी हडपसर यांनी विजेतेपद पटकावले.

उरुळी कांचन : येथील ग्रामदैवत श्रीकाळभैरवनाथ यात्रेनिमित्त आयोजित मॅरेथॉन स्पर्धेत लक्ष्य अकादमी हडपसर यांनी विजेतेपद पटकावले. या स्पर्धेत सर्व वयोगटांतील सुमारे ३१०० स्पर्धकांनी सहभाग घेतला.या स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे ६७ वर्षांचे हरिश्चंद्र थोरात या ज्येष्ठ नागरिकाने सहभाग घेऊन पाचवा क्रमांक पटकावला. त्यांना यापूर्वी प्रौढांच्या जागतिक मैदानी स्पर्धेत आॅस्ट्रेलियात खेळताना ५ किमी धावणे व चालणे या प्रकारात अनुक्रमे ब्राँझ व सिल्व्हर पदक मिळाले आहे. ज्येष्ठ नागरिक महिला व पुरुष गटात सुमारे ७० स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेचे उद्घाटन व बक्षीस वितरण राजाराम कांचन, महादेव कांचन, सुनील जगताप, रमेश केमकर, लक्ष्मण जगताप, अनिल कांचन, हरीश कांचन, लालासो कांचन, तुषार कांचन, नवनाथ कांचन, यांच्या हस्ते व ग्रामस्थांच्या उपस्थितीत करण्यात आले. बक्षीसपात्र स्पर्धकाला कै. शुभम संदेश जगताप यांच्या स्मरणार्थ ट्रॉफी व श्रीकाळभैरवनाथ उत्सव समितीच्या वतीने रोख रक्कम असे बक्षीस देण्यात आले.निकाल पुढीलप्रमाणे : ज्येष्ठ नागरिक गट (४५ च्या पुढचे) प्रथम क्रमांक - महेंद्र किसन बाजारे (फुरसुंगी),द्वितीय क्रमांक - राम राघुजी जागडे (पुणे), तृतीय क्र. तन्वीर इब्राहीम शेख (पुणे), महिला प्रथम क्र. जयश्री मापारी (पुणे), द्वितीय क्र. संगीता शिर्के,(उरुळी कांचन),तृतीय क्र. मेघा चव्हाण (हडपसर). पुरुष खुला गट : प्रथम - सौरभ पोपट जाधव (हडपसर), द्वितीय - केंद्रे रणजित गणेश (हडपसर), तृतीय - पाटील माऊली अशोक (हडपसर), महिला खुला गट - प्रथम क्र. आकांक्षा विठ्ठल गायकवाड फुरसुंगी, द्वितीय क्र - प्रियांका राजू वाघमारे आळंदी म्हातोबा व तृतीय क्र - प्रगती बाळासाहेब जवळकर आळंदी म्हातोबा.१५ वर्षांखालील मुले प्रथम क्र. - साईराज भाऊसो कोळपे,द्वितीय क्रं - साई चिंतामणी कड,व तृतीय क्र - आदित्य दिनेश कदम,१५ वर्षांखालील मुली प्रथम क्र - अपेक्षा विठ्ठल गायकवाड, द्वितीय क्र.- नलिनी विजू पिल्ले व तृतीय क्र - मनस्वी रवींद्र टिळेकर, ११ वर्षांखालील मुली : प्रथम क्र.- निकिता हजारे फुरसुंगी, द्वितीय क्र - शीतल हरिदास डुकरे व तृतीय क्र.- सपना रमेश चौधरी, मुले प्रथम क्र : आदित्य विजू पिल्ले, द्वितीय क्र. गणेश बाबूराव कोळपे व तृतीय क्र.- सूरज तानाजी राखपसरे. या स्पर्धा राष्ट्रीय धावपटू धनंजय मदने यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी विद्यालयाच्या शिक्षकवर्गाने पार पाडल्या.