शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

‘लक्ष्य २०१७’ गवगवा करणारे थंडावले

By admin | Updated: November 14, 2016 03:01 IST

‘लक्ष्य २०१७’ गवगवा करणारे थंडावले

पिंपरी : महापालिका निवडणूक अवघ्या चार महिन्यांवर येऊन ठेवली आहे. इच्छुकांनी नगरसेवक होण्याची स्वप्ने बाळगून महापालिका निवडणूक २०१७ असा गवगवा सुरू केला होता. काळ्या पैशाला पायबंद घालण्यासाठी हजार, पाचशेच्या नोटा चलनातून रद्द केल्याचा केंद्र शासनाचा निर्णय जाहीर झाला. सर्वांची धावपळ उडाली. नोटा बदलून घेण्यासाठी आणि खर्चासाठी सुटे पैसे मिळविण्यासाठी बँकांपुढे लांबच लांब रांगा लागल्याचे दृश्य पाहावयास मिळू लागली. या परिस्थितीत लक्ष २०१७ असा गवगवा करणारे थंडावले असून, केवळ सोशल मीडियावरच त्यांचे अस्तित्व जाणवू लागले आहे. महापालिका निवडणूक जवळ आल्याने सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन, विविध उपक्रम, तसेच मतदारांना आकर्षित करण्याच्या विविध योजना इच्छुकांनी आखल्या होत्या. निवडणुका पैशांवरच लढल्या जातात, हे सूत्र उमगले असल्याने इच्छुकांनी तशी तयारी ठेवली होती. फेरप्रभागरचना झाल्यानंतर पूर्वीचा १० ते १२ हजार मतदार संख्येचा प्रभाग आता ५० हजार मतदार संख्येचा झाला आहे. मिनी विधानसभा मतदारसंघाच्या स्वरूपातील प्रभागात ५० हजार मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी विविध पातळीवर खर्च करावा लागणारच, हे समीकरण लक्षात घेऊन निधी उभारण्याच्या हालचाली सुरू होत्या. निधीची तरतूद करण्याचे काहींचे काम अंतिम टप्प्यात आले असताना, अचानक हजार, पाचशेच्या नोटा चलनातून रद्दचा निर्णय झाला. त्यातच आपल्याकडील सर्व पुंजी बँक खात्यात जमा करणे अनिवार्य झाले. त्यामुळे इच्छुकांची जाहिरातबाजी थांबली आहे. ज्यांचे वॉर्डात काम आहे, परंतु निवडणुकीसाठी खर्च करण्याची ऐपत नाही, अशांना आगामी निवडणूक कशी लढायची? पैसेवाल्यांपुढे आपला टिकाव लागणार का? अशी त्यांच्या मनात चिंता होती. पैसेवाल्यांना या निवडणुकीत हवा तसा पैसा वापरता येणार नाही, अशी परिस्थिती निर्माण झाल्याने ज्यांच्याकडे पैसे नाहीत, त्यांनीही निवडणूक लढण्याचा निर्धार केला आहे. पैशांअभावी त्यांना फ्लेक्सबाजी करता आली नसली, तरी खऱ्या अर्थाने त्यांचा मतदारांशी संपर्क आहे. (प्रतिनिधी)