शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

लस घेणारे तन्मय फडणवीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:08 IST

हेल्थ वर्कर आहे की अभिनेता? ‘हेल्थ केअर वर्कर’ म्हणून लस घेतल्याची बाब झाली उघड बारामती : काही दिवसांपूर्वी वयाच्या ...

हेल्थ वर्कर आहे की अभिनेता?

‘हेल्थ केअर वर्कर’ म्हणून लस घेतल्याची बाब झाली उघड

बारामती : काही दिवसांपूर्वी वयाच्या नियमाचे उल्लंघन करत माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे पुतणे तन्मय फडणवीस यांनी लस घेतली होती. त्यावरून टीका झाली होती. मात्र, तन्मय यांनी ‘हेल्थ केअर वर्कर’ म्हणून लस घेतल्याचे समोर आले.

सोमेश्वरनगर (ता. बारामती) येथील माहिती अधिकार कार्यकर्ते नितीन यादव यांनी माहिती अधिकारात मागविलेल्या माहितीतून ही बाब उघड झाली आहे. मात्र, तन्मय यांच्या ट्विटर अकाऊंटवर त्यांचा ‘अभिनेता’ असा उल्लेख आहे. त्यामुळे तन्मय नक्की कोण आहे? याचा खुलासा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी करावा, असे आवाहन नितीन यादव यांनी केले आहे.

तन्मय फडणवीस हे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे पुतणे आणि माजी मंत्री शोभा फडणवीस यांचे सख्खे नातू आहेत. काही दिवसांपूर्वी वयाच्या नियमात बसत नसतानाही त्यांनी कोरोनावरील लस घेतली होती. तन्मय यांच्या ट्विटरवर पाहिले तर त्यांनी ‘अभिनेता’ असल्याचे नमूद केले आहे. परंतु राज्य सरकारकडे लस घेत असताना ‘हेल्थ केअर वर्कर’ म्हणून त्यांनी उल्लेख केला असल्याची माहिती यादव यांना माहिती अधिकारात उघड झाली आहे. यादव यांनी ही माहिती मागवली होती.