शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
4
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
5
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
6
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
7
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
8
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
9
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
10
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
11
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
12
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
13
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
14
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
15
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
16
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
17
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
18
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
19
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
20
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
Daily Top 2Weekly Top 5

मुलींच्या वसतिगृहाविषयी बोलणोही गुन्हा!

By admin | Updated: July 29, 2014 22:57 IST

विद्यापीठातील मुलींच्या वसतीगृहात एक ना अनेक समस्या आहेत. वेळोवेळी त्या अनेकदा समोरही आल्या आहेत. परंतु सध्या जर एखाद्या गोष्टीविषयी कोणी तक्रार केली

पुणो विद्यापीठातील मुलींच्या वसतीगृहात एक ना अनेक समस्या आहेत. वेळोवेळी त्या अनेकदा समोरही आल्या आहेत. परंतु सध्या जर एखाद्या गोष्टीविषयी कोणी तक्रार केली तर त्या विद्यार्थिनीलाच त्रस दिला जातो. खोली सोडा येथ पासून ते प्रशासकीय कामात अडचण निर्माण केली, विद्यापीठाची बदनामी केली असे कोणतेही आरोप करत विद्यार्थिनींना त्रस दिला जातो, हे विद्यार्थिनींनी नाव न देण्याच्या अटीवर सांगितले. कारण नाव दिले की, आम्हाला अजून त्रस देण्यात येईल अशी भितीही त्यांनी यावेळी व्यक्त केली. 
येथील एकूण यंत्रणाच घाणोरडी असल्याचे सांगितले. मेस मधील जेवण रेक्टरने तपासून मग ते मुलिंना देण्यात यावे असा नियम आहे. परंतु येथील व्यवस्थापिका घरी स्वयंपाक करण्या ऐवजी मेसमधीलच जेवण, नाश्ता घेणो पसंत करत असल्याने मेसच्या दर्जावर बोट उचलणारेच कोणी नाही. परंतु प्रत्यक्षात मेसचा दर्जा एवढा खालावलेला आहे की, विद्यार्थीनी मेसचे जेवण्याऐवजी बाहेरून डबा मागविणो पसंत करतात. म्हणजे विद्यापीठाने सर्व सुविधा पुरवूनही विद्यार्थीनींचे प्रचंड हाल होत आहेत. त्याचप्रमाणो वसतीगृहांना पाण्याचे नियोजन नाही. एका इमारतीतील पाणी संपले की, त्यांना बादल्या घेऊन दुस:या इमारतीत जावे लागते. म्हणजे शिक्षणापेक्षा जणू जगण्याचाच लढा त्यांना द्यावा लागत आहे. येथे सगळ्यांसाठी सार्वजनिक स्वच्छतागृह व स्नानगृहे आहेत. त्यातही विद्यार्थिनी नको म्हणत असताना काहीतरी सुधारणा करायची म्हणून पाश्चात्य पध्दतीचे स्वच्छतागृह बांधण्यात आले. तेथे पाणी अधिक लागते आणि स्वच्छतेविषयी आनंदी आनंद असल्याने मुली तेथे जाणो टाळतात. जीन्या लाईटस् नाहीत. परंतु तक्रार करण्याची सोय नाही.  वसतीगृहातील प्रवेश प्रक्रियाही पारदर्शी नाही. जर कोणाचे नाव वेटींगलिस्टमध्ये असेल त्या विद्यार्थिनीला कळवायला हवे. परंतु तसे न कळवता  खेटा माराव्या लागतात. प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन करण्याची मागणी विध्यार्थीनींनी केली आहे. 
 
आदिवासी वसतिगृहात 
खानावळ 
निकृष्ट
आदिवासी वसतीगृहातील विद्यार्थीनींचे शासनाने पालकत्व घेतले असूनही असुविधा आणि खाण्या-राहण्याची आबाळ अशी अवस्था येथील विद्यार्थिनींची झाली आहे. येथील खानावळीचा दर्जा अत्यंत निकृष्ठ असल्याची तक्रार विद्यार्थिनी कायमच करत असतात. शासन प्रत्येक विद्यार्थिनी मागे 32क्क् रुपये खानावळीसाठी देते. 
 
बाहेर एवढय़ा रुपयांत पंचतारांकीत खानावळ विद्यार्थिनींना मिळेल. परंतु वसतीगृहातील जेवण खाण्यायोग्यही नसते. तसेच मुलींना पास साठी 9क्क् रुपये भत्ता शासन देते. परंतु तोही 6-6 महिने विद्यार्थिनींना मिळत नाही. 
 
सहलीचेही 2क्क्क् रुपये शासन देते. परंतु शासनाने आपल्यासाठी एवढय़ा सुविधा दिल्या आहेत ही माहितीच मुळात विद्यार्थिंनीपर्यंत पोहचू दिली जात नाही. शिवाय पुस्तकेही शासनाकडून मिळतात. मात्र त्यासाठीही मुलींना वारंवार व्यवस्थापनाकडे खेटा माराव्या लागतात. एका खोलीत 14 मुली राहतात. त्यांच्यासाठी केवळ एकच स्वच्छता व स्नानगृह असते. त्यामुळे असुविधा होते.