शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
2
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
3
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
6
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
7
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
8
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
9
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
10
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
11
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
12
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
13
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
14
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
15
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
16
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
17
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
18
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
19
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
20
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!

विलीनीकरणाबाबत अधिवेशनात बोला

By admin | Updated: December 21, 2015 00:31 IST

सत्तेच्या बळावर पीएमआरडीएत पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण विलीन करण्याचा डाव भारतीय जनता पक्षाच्या सरकारचा आहे

सत्तेच्या बळावर पीएमआरडीएत पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण विलीन करण्याचा डाव भारतीय जनता पक्षाच्या सरकारचा आहे. स्मार्ट सिटीत डावलून प्राधिकरणाची शेकडो एकर जमीन, पाचशे काटींचा निधी यावर सरकारचा डोळा असल्याचे दिसून येते. विलीनीकरण होऊ नये, यासाठी सह्यांची मोहीम, जनमत चाचणी घेण्यापेक्षा याबाबत अधिवेशनात शिवसेनेसह अन्य आमदारांनी सरकारची कोंडी करायला हवी. पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाची ४३ वर्षांपूर्वी सुनियोजित शहरासाठी स्थापना झाली. बिल्डरधार्जिण्या धोरणामुळे कामगार, कष्टकरी वर्गास स्वस्तात घरकुल उपलब्ध व्हावे, या उद्देशाने सुरू केलेले प्राधिकरण मूळ उद्देशापासून दूर गेलेले आहे. प्रश्न सुटण्याऐवजी या संस्थेने अनेक प्रश्न वाढविले आहेत. चुकीच्या पद्धतीने झालेले भूसंपादन, शेतकऱ्यांना साडेबारा टक्के परतावा, भूखंड लीज होल्डऐवजी फ्री होल्ड करणे, आरक्षणे विकसित करणे, अनधिकृत बांधकामे नियमित करणे, वाढीव बांधकामे नियमित करणे यापैकी एकही प्रश्न सुटलेले नाहीत. हे प्रश्न सोडविण्याऐवजी ही संस्था पीएमआरडीएत विलीनीकरण करण्याचा डाव आहे. त्यामुळे निवडणुकीपूर्वी भाजपाने दिलेले प्राधिकरण परिसरातील बांधकामे नियमितीकरणाचे आश्वासन हवेत विरणार आहे. आत्तापर्यंत प्राधिकरणाचे प्रश्न सोडविण्यासाठी आंदोलने होत होती. आता त्याचे पीएमआरडीएत विलीनीकरण करू नये, यासाठी आंदोलन पुकारले आहे. जाग येणार कधी?अगोदर प्रश्न सोडवा, प्राधिकरण बरखास्त करून, पीएमआरडीएत नाही, तर महापालिकेत वर्ग करा, अशी मागणी राजकीय पक्षांनी केली आहे. शिवसेना आणि मनसेने आंदोलनाची भूमिका घेतली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने या मुद्द्द्यावर अद्यापही जाग आलेली नाही. स्मार्ट सिटीबाबतही केवळ सर्वसाधारण सभा सोडली, तर शहर समावेशसाठी व्यापक प्रमाणावर जनआंदोलन होणे गरजेचे होते. वास्तविक तसा जोर न लावल्याने गुणवत्ता असतानाही डावलले गेले. आम्ही स्मार्टच आहोत. आमची निवड होणार या फाजील आत्मविश्वासाने, श्रेयवादाच्या राजकारणाचा फटका बसला. आता तरी राजकीय पक्षांनी शहाणे व्हायला हवे. राजकीय कोंडी करण्याची गरजराज्यात सत्तेत सहभागी असताना पीएमआरडीत प्राधिकरणाचे विलीनीकरण करण्यास शिवसेनेने विरोध दर्शविला आहे. विधिमंडळातील अधिवेशनात विरोध करण्यापेक्षा त्यांनी पिंपरी-चिंचवड शहरातच जनमत चाचणी घेऊन आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. मनसेनेही सह्यांची मोहीम राबविण्याचे ठरविले आहे. भारतीय जनता पक्षातील स्थानिक नेत्यांचाही या निर्णयास विरोध आहे. मात्र, मोठ्या नेत्यांच्या विरोधात बोलायचे कसे, ते काय बोलतील, याची भीती येथील नेत्यांना आहे. त्यामुळे ठळक भूमिका भाजपाने घेतलेली नाही. आंदोलन जनमत चाचणी किंवा सह्यांची मोहीम राबविण्यापेक्षा कडक भूमिका राजकीय पक्षांनी घेण्याची गरज आहे.