शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

तळेघरचा ‘शिमग्याचा बाजार’ रद्द, लाखो रुपयांची होणारी उलाढाल थंडावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:09 IST

या निर्णयाचे स्वागत असले तरी लाखोंची उलाढाल थांबली असून, छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांना ह्या बंदचा तोटा सहन करावा लागला आहे. ...

या निर्णयाचे स्वागत असले तरी लाखोंची उलाढाल थांबली असून, छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांना ह्या बंदचा तोटा सहन करावा लागला आहे.

आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागात असणाऱ्या भीमाशंकर, पाटण व आहुपे खोऱ्यामध्ये तळेघर येथील एकमेव आठवडे बाजार आहे. त्यामुळे या तीनही खोऱ्यांतील आदिवासी बांधवांनी होळी या सणानिमित्त खरेदी करण्यासाठी लगबग असते. तळेघर येथे बाजारासाठी विविध ठिकाणाहून व्यापारी आदल्या दिवशीच रात्री मुक्कामी येत असतात. मात्र यंदाच्या वर्षी कोरोनाच्या सावटामुळे बाजार भरला नाही.

आदिवासी भागामध्ये होळीच्या बाजाराला पारंपरिक भाषेमध्ये "शिमग्याचा बाजार" असे म्हणतात. बारा महिन्यांतील बैलपोळा व होळी या दोन सणांसाठी होणाऱ्या आठवडे बाजारांमध्ये मोठ्या प्रमाणात उलाढाल होत असते.

भीमाशंकर पाटण व आहुपे त्याचप्रमाणे कोकणातील व जुन्नर खेड तालुक्यातील अनेक नागरिक तळेघर येथील होळीच्या आठवडे बाजारामध्ये गूळ, डाळ, खोबरे, लाल मिरच्या, तेलाचे डबे खरेदी करण्यासाठी येत असतात. या बाजाराचे वैशिष्ट्य म्हणजे कोकणी बांधव हे आपल्या भागात पिकणारे कडधान्य सिडीघाट व बैल घाटाने डोक्यावर घेऊन येतात. आपले कडधान्य व्यापाऱ्यांना देऊन या मोबदल्यात लाल मिरच्या गोड तेल डबे व इतर साहित्य खरेदी करतात. ही देवाणघेवाणची प्रथा गेले कित्येक वर्षांपासून आजतागायत टिकून आहे.

मात्र यंदाच्या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आदिवासी भागातील आठवडे बाजार बंद ठेवण्यात आला आहे. नागरिकांनी स्वतःची काळजी घेण्याचे आवाहन तळेघरचे सरपंच चंद्रकांत उगले व स्थानिक ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद ठेवण्यात आलेला तळेघर (आंबेगाव) येथील आठवडे बाजार.

( छायाचिञ संतोष जाधव )