शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

पाणीबचतीसाठी तळेगावात प्रयत्न

By admin | Updated: April 26, 2016 02:19 IST

दुष्काळी परिस्थिती आणि धरणातील कमी पाणीसाठ्याचा विचार करता आगामी दोन महिने शहरास पाणीपुरवठा सुरळीत सुरू ठेवण्यासाठी नगरपालिकेने जलबचत अभियानाद्वारे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत.

तळेगाव स्टेशन : दुष्काळी परिस्थिती आणि धरणातील कमी पाणीसाठ्याचा विचार करता आगामी दोन महिने शहरास पाणीपुरवठा सुरळीत सुरू ठेवण्यासाठी नगरपालिकेने जलबचत अभियानाद्वारे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत. त्यासाठी जलबचत अभियानास नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद द्यावा, असे आवाहन पाणीपुरवठा समितीचे सभापती व उपनगराध्यक्ष गणेश खांडगे यांनी केले आहे.याबाबत खांडगे म्हणाले, ‘‘पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी नगर परिषदेत सर्व नगरसेवक, मुख्याधिकारी आणि अधिकारी यांची बैठक घेण्यात आली. त्यात घेण्यात आलेल्या निर्णयानुसार पहिल्या टप्प्यात गाव भागातील सार्वजनिक नळकोंडाळी, गृहसंकुलातील पाण्याच्या टाक्या आणि गळतीच्या ठिकाणांवर पाणी वाया जाणार नाही, अशा उपाययोजनांचे काम सुरू केले आहे. रविवारपर्यंत ११२ नळांना तोट्या बसविण्यात आल्या. त्याची नोंद केली आहे. पाणी विभागाचे कर्मचारी आणि सुमारे १५० जलदूतांच्या साहाय्याने त्यावर लक्ष ठेवण्यात येत आहे. जर पुन्हा तोट्या काढल्या गेल्या, तर संबंधितांचे नळजोड तोडून दंडात्मक कारवाई केली जाईल. गावभागातील मोहिमेनंतर स्टेशन भागातही मोहीम येत्या आठवड्यात सुरू करण्यात येणार आहे. नागरिकांच्या सहकार्याने पावसाळ्यापर्यंत पाणीपुरवठा सुरळीत सुरू ठेवता येईल. (वार्ताहर)