शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

तळेगाव ढमढेरेला बिबट्याची दहशत

By admin | Updated: April 25, 2017 03:50 IST

परिसरात बिबट्याच्या वावरामुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाल्याने वाड्यावस्त्यांवरील नागरिक सायंकाळनंतर घराबाहेरही पडत नाहीत.

तळेगाव ढमढेरे : परिसरात बिबट्याच्या वावरामुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाल्याने वाड्यावस्त्यांवरील नागरिक सायंकाळनंतर घराबाहेरही पडत नाहीत.बिबट्याच्या वावराबाबत वनविभागाचे बी. ए. गायकवाड यांनी सांगितले, की तळेगाव ढमढेरे परिसरात भोसे वस्ती, कवटीचा मळा, खंडोबा मंदिर परिसर, गुरव मळा, जगताप वस्ती, कमेवाडी आदी परिसरात बिबट्याने दि. १६ रोजी खंडोबा मंदिरानजीक वासरावर हल्ला केला. दि. २२ रोजी गुरवमळा येथे तर २३ रोजी भोसे वस्ती येथे पाळीव जनावरांवर हल्ले केले आहेत. या तीनही घटनेत तीन प्राण्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार खंडोबा मंदिराच्या पूर्व दिशेला उमेश ढमढेरे यांच्या शेतीच्या हद्दीत शनिवार, दि. २२ रोजी पिंजरा लावला आहे. परंतु अद्याप बिबट्या जेरबंद झालेला नाही. साधारण ५ किलोमीटर अंतरावर गुरवमळा येथे शेतकऱ्यांना २ ते ३ वेळा बिबट्याचे दर्शन झाल्याने येथील नागरिकांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली आहे.सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने दिवसभर विजेचा लपंडाव चाललेला असतो. त्यामुळे पिकांना जगवण्यासाठी शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी मोटारी चालू करून पाणी द्यावे लागते. एका शेतकऱ्याच्या शेतीला पाणी द्यायचे म्हटले तरी वस्तीवरील शेतकरी ग्रुपने टेंबे लावून शेतामध्ये पाणी देण्यास जात आहेत. परंतु बिबट्या इकडून येतो, की तिकडून येतो ही भीती मात्र मनामध्ये घर करून बसल्याचे शेतकरी सांगत आहेत. (वार्ताहर)