शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

खेड तालुक्यातील तलाठी झाले हायटेक

By admin | Updated: January 7, 2016 01:35 IST

खेड तालुक्यातील गावोगावच्या तलाठी कार्यालयांमध्ये तलाठी (भाऊसाहेब) संगणकासमोर बसून माऊसवर हात फिरवत झटपट उतारे मिलत आहे

पाईट : खेड तालुक्यातील गावोगावच्या तलाठी कार्यालयांमध्ये तलाठी (भाऊसाहेब) संगणकासमोर बसून माऊसवर हात फिरवत झटपट उतारे मिलत आहे. त्यामुळे बळीराजाला संगणकीकृत अपडेट सातबारा उतारे मिळत असल्याने तलाठी आता हायटेक झाल्याची चर्चा शेतकऱ्यांमध्ये आहे.महाराष्ट्र शासनाच्या संगणकीकृत सातबारा या महत्त्वाकांक्षी योजनेमध्ये खेड तालुक्याने आघाडी घेतली असली तरी अद्याप या योजनेमध्ये मोठ्या त्रुटी राहिल्या असल्याचे चित्र आहे. यामुळे अनेक कामे रखडत आहेत. असे होत असले तरी गावोगावी भाऊसाहेब मात्र लॅपटॉप घेऊन तलाठी कार्यालयात काम करताना दिसत आहेत. सध्या अनेक भाऊसाहेबांना या संगणकप्रणाली जुळवून घेताना मोठी कसरत करावी लागते. निवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या अनेकांनी ते समजावून घेण्याऐवजी तालुक्यातील संगणक कक्षाचा आधार घेत कामकाज करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. फेरफार आज्ञावलीअंतर्गत खेड तालुक्यातील सर्व डाटा स्टेट डाटा सेंटरवर अपलोड झाला आहे. संगणकीकृत सातबाराचे सर्व कामकाज २३ आॅक्टोबरमध्ये पूर्ण अपेक्षित असताना ते डिसेंबरअखेर पूर्ण झाले आहे. आता संगणकीकृत सातबारा उतारे तलाठी कार्यालयातून मिळण्यास सुरुवात झाली असली, तरी सध्या २५ टक्के सातबारावर त्रुटी राहिल्या असल्या तरी त्या दूर करण्याच्या कामात सर्व तलाठी एकवटले असल्याचे दिसत असून, या प्रणालीमुळे अनेक अडचणी दूर होणार आहेत. कामकाजाला मोठी गती मिळत असल्याचे दिसत आहे. यामध्ये तो सध्या आॅनलाईन फेरफार व त्यांच्या नोंदी सातबारावर होत असल्याचे दिसत आहे.खेड तालुक्यात संगणकावर सातबारे मिळू लागल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. मात्र या यंत्रणेमध्ये काही प्रमाणात त्रुटी असल्याने अडचण निर्माण होत आहे. ती दूर करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.