शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
2
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
3
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
4
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
5
अरे देवा! जीवघेण्या धबधब्याच्या काठावर 'ती' बनवत होती 'रील', थरकाप उडवणारा Video Viral
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
"मटण खाणारे पण वारीला आले" म्हणणाऱ्यांना DPने सुनावलं, म्हणाला- "हो मी मटण खातो पण..."
8
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
9
भारताला दिलासा! मित्र देश पाकिस्तानलाच चीननं दिला मोठा झटका; शहबाज शरीफांचं टेन्शन वाढले
10
ठाकरे बंधूंच्या मोर्चात राष्ट्रवादी अजित पवार गट सहभागी होणार का? सुनील तटकरेंचे सूचक विधान
11
पत्नी म्हणाली "अंगाला हात लावू देणार नाही", चिडलेल्या पतीने व्हिडीओ सुरू केला, गळ्यावर पाय ठेवला अन्... 
12
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
13
केदारनाथ येथील हेलिकॉप्टर अपघातात पायलट मुलाचा मृत्यू, पुत्रवियोगाने दु:खी आईने १३ दिवसांनी सोडले प्राण  
14
Aadhaar Card वर तुम्ही मोबाइल नंबर ऑनलाइन बदलू शकता का? काय आहे सर्वात सोपी प्रोसेस, पाहा
15
पाकिस्तानात मोठा आत्मघातकी हल्ला; स्फोटात १३ जवान ठार तर २० हून अधिक गंभीर जखमी
16
₹५००० ची सामान्य एसआयपी की स्टेप अप SIP; कोणती पद्धत लवकर बनवू शकते श्रीमंत? पाहा नफ्याचं गणित
17
'लेडी सेहवाग'च्या 'कमबॅक'मध्ये सचिन तेंडुलकरचा हात! जाणून घ्या त्यामागची स्टोरी
18
रशियानं निभावली मैत्री! युक्रेन युद्धात मदत करणाऱ्या हुकुमशाह किमसाठी बनवला सुंदर सागरी किनारा
19
राज्यातील सर्वांत मोठे स्क्रॅपिंग सेंटर STच्या जागेवर उभारले जाणार; प्रताप सरनाईकांची माहिती
20
"भाषा धोरणात भाजपाचा दुटप्पीपणा उघड, गुजरातमध्ये पहिलीपासून हिंदीची सक्ती नाही तर महाराष्ट्रातच कशासाठी?’’ काँग्रेसचा सवाल   

तळीराम, रोमिओंवर कारवाई करणार

By admin | Updated: February 2, 2015 23:21 IST

नाथाचीवाडी व लडकतवाडी या गावांमधील ग्रामदेवतांचे यात्रा उत्सव सुरळीत पार पडावेत, यासाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.

यवत : यवत, पारगाव (सा. मा.), नाथाचीवाडी व लडकतवाडी या गावांमधील ग्रामदेवतांचे यात्रा उत्सव सुरळीत पार पडावेत, यासाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. हुल्लडबाजी व भांडणे करणाऱ्यांना पोलिसी खाक्या दाखविणार असल्याचा इशारा यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेंद्र्र पाटील यांनी दिला आहे.यवत येथील ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ यात्रा उत्सव दि. ३ व ४ फेब्रुवारी रोजी होणार आहे. यानिमित्त यवत ग्रामस्थांनी पाटील यांची भेट घेऊन पोलीस बंदोबस्त देण्याची मागणी केली. या वेळी भीमा-पाटस कारखान्याचे संचालक सुरेश शेळके, श्री काळभैरवनाथ पतसंस्थेचे अध्यक्ष नानासाहेब दोरगे, देवस्थान कमिटीचे अध्यक्ष शंकर दोरगे, शिवसेनेचे शाखा अध्यक्ष श्रीपती दोरगे, दत्तात्रय दोरगे, बापू दोरगे, पोलीस उपनिरीक्षक सुशांत किनगे आदी उपस्थित होते.यात्रेच्या काळात विशेष करून देवांचा छबिना, तमाशा, कुस्त्यांचा आखाडा व पाळणे असलेल्या भागात बंदोबस्त देण्याची मागणी केली. तमाशा व पाळणे असलेल्या ठिकाणी काही तळीराम व रोमिओ गोंधळ घालत असतात. यामुळे विनाकारण भांडणे व मारामारी घडून यात्रा उत्सवात गालबोट लागते. याकडे लक्ष देण्याची मागणी यवत ग्रामस्थांनी केली.या वेळी पाटील यांनी, यवतसह परिसरातील नाथाचीवाडी, लडकतवाडी व पारगाव (सा. मा.) या गावातील ग्राम दैवतांचा उत्सव दि.१ ते ४ फेब्रुवारीदरम्यान होणार आहे. यामुळे यवत पोलीस सतर्क आहेत. यात्रा काळात विशेष करून तळीराम मंडळी जोमात असतात. त्यांच्यावर विशेष लक्ष ठेवणार आहे. गर्दीच्या ठिकाणी साध्या वेशातील पोलीस लक्ष ठेवणार आहेत. तसेच गर्दीचा फायदा घेऊन यात्रा काळात महिलांचे दागिने चोरीचे प्रकार घडत असतात. यासाठी महिलांनी सतर्क राहणे गरजेचे आहे. महिलांची गर्दी असणाऱ्या ठिकाणी महिला पोलीस देखील बंदोबस्तासाठी उपस्थित असतील. येथील ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ यात्रा उत्सव दि. ३ पासून सुरू होत आहे. यवत : येथील ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ यात्रा उत्सव उद्यापासून (दि. ३) सुरू होत आहे. यानिमित्त ग्रामस्थांनी जय्यत तयारी केली आहे. परंपरागत पद्धतीने दरवर्षी माघ महिन्यातील पौर्णिमेला हा यात्रोत्सव साजरा केला जातो. मंगळवार (दि.३) व बुधवार (दि.४) रोजी श्री काळभैरवनाथ व श्री महालक्ष्मी मातेचा उत्सव गावात साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ४मंगळवार (दि.३) रोजी सकाळी ५ ते ६ श्री नाथांची महापूजा, सकाळी ६ ते ९ देवाला पाणी घालणे, सकाळी ९ ते ११ देवाचा पोषाख, ११ ते ६ दंडवत व नैवेद्य, सायंकाळी ६ ते ८ काठ्यांची सवाद्य मिरवणूक होणार आहे. रात्री छबीना व भिका भीमा सांगवीकर यांचा लोकनाट्याचा तमाशा होणार आहे.४बुधवार (दि.४) सकाळी ८ ते १ भिका भीमा सांगवीकर यांचा लोकनाट्य तमाशाचा कार्यक्रम होणार आहे. दुपारी ४ वाजता नामवंत पहिलवानांच्या कुस्त्यांचा जंगी आखाडा रंगणार आहे. रात्री कै. तुकाराम खेडेकरसह पांडुरंग मुळे, मांजरवाडीकर यांचा लोकनाट्य तमाशा होईल अशी माहिती ग्रामस्थ मंडळ व महालक्ष्मी माता प्रतिष्ठान, यवत यांच्या वतीने देण्यात आली.