शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

शिपाईपदाची परीक्षा नव्याने घेणार

By admin | Updated: November 30, 2015 02:00 IST

जिल्हा परिषदेच्याच कर्मचाऱ्याने एका सेंटरवर जाऊन पेपर स्कॅन केल्याचा संशय आल्याने या पदाची परीक्षा पुन्हा घेण्याचा निर्णय घेतला

पुणे : जिल्हा परिषदेच्याच कर्मचाऱ्याने एका सेंटरवर जाऊन पेपर स्कॅन केल्याचा संशय आल्याने या पदाची परीक्षा पुन्हा घेण्याचा निर्णय घेतला असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कांतिलाल उमाप यांनी सांगितले.१८५ जागांसाठी ३८ हजार ३0४ अर्ज आले होते. २५ व २८ नोव्हेंबर रोजी काही पदांची परीक्षा सुरळीत झाली. आज परिचर पदाची परीक्षा होते. या पदासाठी ४0 जागांसाठी १६ हजार ९९0 अर्ज आले होते. आज परीक्षा सुरू असताना पुणे येथील आगरकर मुलींच्या शाळेत जिल्हा परिषदेच्या एका कर्मचाऱ्याने सेंटरवर जाऊन पेपर स्कॅन केल्याचा प्रकार केला. हा प्रकार किरकोळ असला तरी उमेदवारांमध्ये परीक्षा प्रक्रियाविषयी संशय निर्माण होऊ नये म्हणून परीक्षा परत घेण्याचा निर्णय घेतल्याचे उमप यांनी सांगितले. सदर कर्मचाऱ्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल असेही ते म्हणाले.तत्पूर्वी, विविध पदांसाठी रविवारी घेण्यात आलेल्या परीक्षासाठी परीक्षार्थींना देण्यात आलेल्या प्रवेश पत्रावरील परीक्षा केंद्र एका रात्रीत बदलण्यात आले. त्यामुळे राज्यातील विविध ठिकाणाहून पुण्यात परीक्षा देण्यासाठी आलेल्या उमेदवारांचे हाल झाले. परीक्षा केंद्र प्रमुखांकडूनही या परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना चुकीची वागणूक देण्यात आली. त्यामुळे उमेदवारांनी संताप व्यक्त केला. तसेच ही परीक्षा पुन्हा घ्यावी अशी मागणी केली.जिल्हा परिषदेच्या परिचर पदासह इतर विविध पदांच्या जागांसाठी रविवारी परीक्षा घेतली जाणार होती. पुणे शहरासह जिल्ह्यातील विविध शाळा व महाविद्यालयांमध्ये उमेदवारांची बैठक व्यवस्था करण्यात आली होती. उमेदवारांना काही दिवसांपूर्वी आॅनलाईन पद्धतीने प्रवेशपत्र देण्यात आले होते. एमकेसीएलच्या संकेतस्थळावरून काही उमेदवारांनी दोन दिवसांपूर्वी तर काहींनी शनिवारी सायंकाळी ५ वाजता प्रवेशपत्र काढून घेतले होते. त्या वेळी प्रवेशपत्रावरील परीक्षा केंद्रात कोणतेही बदल करण्यात आले नव्हते. मात्र, शनिवारी रात्री अचानक उमेदवारांचे परीक्षा केंद्र बदलण्यात आले. बदलण्यात आलेल्या परीक्षा केंद्राबाबत उमेदवारांना कोणतीही माहिती नव्हती. त्यामुळे सर्व उमेदवार प्रवेशपत्रावर नमूद केलेल्या परीक्षा केंद्रावर जाऊन पोहचले. मात्र, संबंधित केंद्रावर बैठक क्रमांक नसल्याने उमेदवारांना परीक्षेस बसू दिले नाही. परीक्षा केंद्र बदलाची माहिती रात्री एसएमएसद्वारे सर्वांना कळविण्यात आली असल्याचे परीक्षा केंद्रावरील अधिकारी सांंंगत होते.जुन्नर येथून परीक्षा देण्यासाठी आलेल्या विष्णू भालचिम याने सांगितले, परिचर पदासाठीच्या परीक्षेसाठी मी दोन दिवसांपूर्वी एमकेसीएलच्या संकेतस्थळावरून प्रवेशपत्र काढून घेतले होते. त्या वेळी माझे परीक्षा केंद्र उरुळी कांचन येथील महात्मा गांधी विद्यालयात होते. मात्र, रात्रीतून माझे परीक्षा केंद्र बदलून डेक्कन येथील विमलाबाई गरवारे विद्यालय करण्यात आले. परीक्षा केंद्रावरील अधिकाऱ्यांनी केंद्र बदलाची माहिती दिल्यावर मी सुधारित प्रवेशपत्र काढून नवीन केंद्रावर पोहचलो. मात्र, मला परीक्षेस बसू दिले नाही. माझ्यासारख्या अनेक उमेदवारांना परीक्षा देता आली नाही. त्यामुळे काही कारणास्तव परीक्षा न देऊू शकलेल्या उमेदवारांची पुन्हा परीक्षा घ्यावी.औदुंबर कांबळे म्हणाला, माझे परीक्षा केंद्र शनिवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत उरळी कांचन येथील होते. रात्रीतून ते बदलून शिवाजीनगर येथील मॉडर्न कॉलेज करण्यात आले. माझे अनेक मित्र लातूरहून प्रवास करून ही परीक्षा देण्यासाठी आले होते.परीक्षा न देता आल्याने परीक्षा केंद्रावर उमेदवार रडताना दिसून आले. परीक्षा केंद्र प्रमुखांकडून उमेदवारांना वाईट वागणूक देण्यात आली.