शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येणार?; शरद पवारांचं सर्वात मोठं विधान, राजकीय वर्तुळात उधाण
2
“नरेंद्र मोदींसारखेच पंतप्रधान देशाला वर्षानुवर्षे लाभो”; कुणाची सिद्धिविनायक चरणी प्रार्थना?
3
सोफिया कुरेशींचा धर्म काय? राफेलची किंमत किती?; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तानी करू लागले गुगल सर्च
4
Operation Sindoor: मोठी तयारी! 'ऑपरेशन सिंदूर' 2.0 होणार? पंतप्रधान मोदींना भेटण्यासाठी अजित डोवाल पोहोचले
5
Operation Sindoor : "ऑपरेशन सिंदूर हे वीर पत्नींच्या अश्रूंचं उत्तर, आमचं कुंकू आता शौर्य आणि..."; ऐशन्या झाली भावुक
6
"शक्य असेल तर वाचवा..."; ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख करत जयपूरमधील स्टेडियम उडवून देण्याची धमकी
7
Rajnath Singh : 'ऑपरेशन सिंदूर' आणि हनुमान यांचा काय संबंध? राजनाथ सिंह यांनी सांगितला श्लोकाचा खरा अर्थ
8
Naxal Attack: नक्षलवाद्यांच्या भूसुंरुग स्फोटात तीन जवानांना वीरमरण; तेलंगणाच्या जंगलात तुफान चकमक
9
₹१,७०,००० वर जाणार हा शेअर, एक्सपर्ट बुलिश; दिला खरेदीचा सल्ला
10
"ते आताही पहारा देत होते...", 'ऑपरेशन सिंदूर'दरम्यान अभिनेत्रीने शहीद वडिलांच्या आठवणींना दिला उजाळा
11
Meta ने २३,००० फेसबुक अकाउंट अचानक केले गायब, 'या' लोकांवर मोठी कारवाई
12
“‘ऑपरेशन सिंदूर’ची कारवाई योग्यच, भारताने सूड घेतला, कुणी काही बोलू शकत नाही”: अण्णा हजारे
13
ऑपरेशन सिंदूर नंतर आणखी मोठी कारवाई होणार? केंद्राने हवाई दलाला दिले पूर्ण स्वातंत्र्य...
14
'ऑपरेशन सिंदूर'च्या रात्री १०.३० वाजता अखेरचं बोलणं, पहाटे ३ वाजता पुन्हा कॉल, पण...
15
प्रचंड गुप्तता, २ दिवसांपूर्वी अधिकारी क्वारंटाईन; 'ऑपरेशन सिंदूर'ची 'अशी' केली तयारी
16
“संधी मिळाली तर पाकचा खात्मा करून टाकेन”; कर्नल सोफिया कुरेशींच्या वडिलांची प्रतिक्रिया
17
पाकिस्तानच्या सुरक्षा सल्लागारांनी अजित डोवाल यांना फोन केला? तुर्की मीडियाचा दावा
18
सेटवर पोलीस आले अन् अभिनेत्याला घेऊन गेले; गर्लफ्रेंडने केले गंभीर आरोप, नेमकं प्रकरण काय?
19
पाकिस्तानी कुरापती! गुजरात बॉर्डरवर आढळले संशयास्पद ड्रोन; विजेच्या तारांना धडकताच स्फोट
20
अंगावरचे कपडे फाडले, बेदम मारहाण; 'यु ट्युबर'वर रेल्वेतील पॅन्ट्री कर्मचाऱ्यांचा हल्ला, कारण...

दुष्काळग्रस्तांचे प्रश्न कायमचे सोडवण्यास उपाय योजणार

By admin | Updated: October 12, 2015 01:14 IST

आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या विधवा पत्नीला आर्थिक स्वरूपात मदत केली ती तात्पुरती मलमपट्टी होती.

पुणे : आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या विधवा पत्नीला आर्थिक स्वरूपात मदत केली ती तात्पुरती मलमपट्टी होती. येथून पुढे आम्ही आर्थिक मदत देणार नाही, तर या प्रश्नावर कायमस्वरूपी उपाय योजत मराठवाड्यातील ग्रामीण भागातील जनतेला रोजगार देणे तसेच जलस्रोताचे पुनरुज्जीवन करणे ही कामे हाती घेणार आहोत, अशी माहिती नाम फाउंडेशनचे संस्थापक अभिनेते नाना पाटेकर यांनी रविवारी दिली. नागरिकांशी संवाद साधणे तसेच मदतनिधीची उभारणी करण्यासाठी नाना पाटेकर शहरात आले होते. पुण्यातील नाम फाउंडेशनच्या कार्यालयावर सकाळपासून अनेक पुणेकरांनी नानांची भेट घेतली व दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्या मदतीसाठी हात पुढे केले. काही महिला संघटनांनी गणपतीच्या काळात गणेशभक्तांकडून आर्थिक मदत गोळा केली होती. वरिष्ठ नागरिकांच्या गटांनी जमवलेली रक्कम शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आणली होती. तर अनेकांनी वैयक्तिक पातळीवर आपापल्या परीने जी काही मदत देता येईल ती करण्याचा प्रयत्न केला. काही विद्यार्थ्यांनी स्वत:च्या वाढदिवसावर खर्च न करता तो पैसा शेतकऱ्यांच्या मदतीसाठी नानांकडे सुपूर्द केला. या वेळी नाना म्हणाले, समोरच्या व्यक्तीला दुर्बल बनवायचं नाही. दान माणसाला नादान बनविते. मात्र, पुढील काळात आर्थिक मदतीऐवजी कायमस्वरूपी काम करण्यावर भर देण्यात येईल. पावसाळा संपल्यानंतर गरजू लोकांना कपडे शिवणे, सूत कातणे यासारखी इतर स्वयंरोजगाराची कामे उपलब्ध करून देणार आहोत. याबरोबरच गावांमधील आटलेले जलस्रोतांचे स्थानिकांच्या मदतीने श्रमदानातून पुनरुज्जीवन करणार आहोत.ग्रामीण भागातील लोक जात-धर्म, पक्षीय वितुष्ट या गोष्टीमध्ये अडकले आहेत. दुसरीकडे लोकांचे पोट भरणाऱ्या शेतकरी बांधवांमध्ये आपल्याबद्दल कुणाला काही वाटत नाही, असा समज झाला आहे. त्यांची ही निराशावादी वृत्ती बदलली पाहिजे. ज्यांना आपल्या गावात पाणी प्रश्नावर काम करायचं आहे त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा. नोकरीनिमित्त शहरात स्थलांतरित झालेल्या तरुणांना गावात परत आणावे लागेल, असे नानांनी नमूद केले.