शहरं
Join us  
Trending Stories
1
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
2
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
3
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
4
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
5
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
6
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
7
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू
8
ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
9
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
10
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
11
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
12
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
13
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
14
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
15
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
16
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
17
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
18
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
19
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
20
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल

पुणेकरांनो काळजी घ्या, आपल्याला कोरोना विरोधातील मॅच जिंकायची आहे: हरभजन सिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 19:33 IST

फिरत्या कोरोना चाचणी व्हॅन चे उद्घाटन 

पुणे : सध्याची परिस्थिती कठीण आहे. एकत्र येऊन आपल्याला यशस्वी लढा देयचा आहे. लवकर निदान व्हावे, म्हणून कोरोनाची टेस्ट करणे गरजेचे आहे. त्यामुळे उपचार तात्काळ घेता येतील. पुढील धोका आपल्याला टाळता येऊ शकेल. तरच आपल्याला कोरोना विरोधातील मॅच जिंकता येईल. असे मत व्यक्त करून पुणे कोरोना काळजी घ्या. आपल्याला महाराष्ट्र कोरोना मुक्त करायचा आहे. असे आवाहन प्रसिद्ध क्रिकेटपटू हरभजनसिंग यांनी व्यक्त केले. 

भाजपाच्या माध्यमातून पुण्यातील नागरिकांच्या आरटीपीसीआर  आणि रॅपिड अँटीजेन चाचण्या करण्यासाठी फिरत्या कोरोना चाचणी व्हॅनचे उद्घाटन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यवाह महेश करपे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ऑनलाईन कार्यक्रमात हरभजनसिंग बोलत होते. 

यावेळी आमदार व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील शहराध्यक्ष जगदीश मुळीक, गटनेते गणेश बीडकर , सरचिटणीस गणेश घोष, स्थानिक नगरसेवक योगेश मुळीक, नगरसेविका सुनीता गलांडे व पदाधिकारी उपस्थित होते. 

पाटील म्हणाले, कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट वेगळी आहे. यावेळी कोरोनाने सर्वांनाच मानसिकदृष्टया हलविले आहे. परमेश्वराने सर्वांना एका पातळीवर आणून ठेवले आहे. जीवन हा एक खेळ आहे, तो खेळायचा आणि जायचे असते. असे प्रवचनात ऐकत होतो. आता मात्र अनुभवतो आहे. कोरोनाच्या टेस्ट केल्याने लवकर निदान समजले तर आपल्याला वेळीच उपचार घेता येतील. कामगार वर्गाला तसेच कर्मचाऱ्यांना टेस्ट करण्यासाठी सांगण्यात आले आहे. त्यामुळे लॅब वरील ताण वाढला आहे. कोरोनावर मात करायची असेल तर आपल्याला टेस्ट वाढवाव्या लागतील. त्यामुळे कोरोना चाचणी व्हॅनची संकल्पना राबविण्यात येत आहे. हरभजनसिंग यांनी व्हॅन उपलब्ध करून दिली आहे. 

आरटीपीसीआर टेस्ट ही केवळ ५०० रुपयांत केली जाणार असून रिपोर्ट सात तासात मिळणार आहे. तर अँटिजेन  टेस्ट २५० रुपयांमध्ये केली जाणार असून रिपोर्ट अवघ्या १५ मिनिटांत मिळणार आहे. त्यामुळे पुढील उपचार घेता येणं शक्य होणार आहे. पुण्यातील मतदारसंघात दोन दोन दिवस ही व्हॅन फिरणार असून दिवसाला आरटीपीसीआरची ६ हजार जणांच्या टेस्ट आणि अँटिजेन  टेस्ट १५०० करता येणार आहेत असेही पाटील म्हणाले.

शहराध्यक्ष मुळीक म्हणाले, अंगावर दुखणे काढल्यामुळे काहींना थेट अतिदक्षता विभागात (आयसीयु) दाखल करावे लागण्याच्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे वेळ न घालवता टेस्ट केली तर निदान लवकर समजेल. व्हॅनच्या माध्यमातून जास्तीतजास्त टेस्ट केल्या जाणार आहेत. त्यामुळे धोका टाळण्यासाठी मदत होणार आहे. रुग्णसंख्या वाढत असल्याने टेस्ट प्रमाण देखील वाढविण्याची गरज आहे.

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याchandrakant patilचंद्रकांत पाटीलHarbhajan Singhहरभजन सिंग