शहरं
Join us  
Trending Stories
1
घातपात की आणखी काही? योगी आदित्यनाथांच्या दौऱ्यापूर्वी ५०० किलो स्फोटके सापडली; 20 किमीपर्यंत पेरली...
2
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
3
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
4
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
5
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
6
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
7
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
8
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
9
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
10
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
11
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
12
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
13
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
14
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
15
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
16
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
17
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
18
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
19
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा

बारामतीत बेशिस्त पार्किंगवर कारवाईचा बडगा

By admin | Updated: December 22, 2015 01:33 IST

: शहरातील बेशिस्त वाहनचालकांवर शहर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे.

बारामती : शहरातील बेशिस्त वाहनचालकांवर शहर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. सोमवारी सकाळी नऊ वाजल्यापासून शहरातील प्रमुख चौकांमधील बेशिस्तपणे पार्किंग केलेल्या ५० वाहनांवर पोलिसांनी कारवाई केली. शहरातील पार्किंगची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. ‘लोकमत’ने सातत्याने शहरातील वाहतूक व पार्किंगच्या समस्येबाबत पाठपुरावा केला आहे. शहरातील बेशिस्त वाहतूक, अस्ताव्यस्त पार्किंग व दिखाऊ सिग्नल यंत्रणा यामुळे छोठे-मोठे अपघात नित्याचेच झाले आहेत. त्यातच पदपथांवर वाढलेल्या अतिक्रमणांमुळे पायी जाणाऱ्या नागरिकांना अपघातांना सामोरे जावे लागते. वाहतूक पोलिसांकडून बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई होते. मात्र या कारवाईत सातत्य नाही. ही समस्या प्रामुख्याने महावीर पथ, कचेरी रस्ता, छत्रपती शिवाजी महाराज रस्ता (सिनेमा रोड), गुणवडी चौक, भिगवण चौक, भाजी मंडईचा परिसर, कारभारी चौक या ठिकाणी मोठ्या प्रमाणत आहे. बाजारपेठेतील रस्त्यांच्या रुंदीच्या मानाने त्यावर वाहनांचा अधिक भार आहे. एखादे चारचाकी वाहन या ठिकाणाहून निघाल्यास त्याच्या मागे वाहनांची रांग लागते. (प्रतिनिधी)