पुणे : महापालिकेच्या जलतरण तलावांसह, खासगी सोसायट्या, क्लब, हॉटेलमधील सर्व तलावांच्या सुरक्षा यंत्रणेची; तसेच सुरक्षा नियमांच्या अंमलबजावणीची तपासणी पालिकेकडून करण्यात येणार आहे, असे भूसंपादन आणि व्यवस्थापन विभागाचे प्रमुख सतीश कुलकर्णी यांनी सांगितले. ‘लोकमत’ ने याबाबत आवाज उठविल्याने तातडीने दखल घेण्यात आली आहे. शहरात महापालिकेचे सुमारे २१ जलतरण तलाव आहेत. त्यातील जवळपास १५ तलाव सुरू आहेत. त्यातील काही प्रमुख तलावांची पाहणी केली होती. (प्रतिनिधी)
जलतरण तलावांची तपासणी
By admin | Updated: April 9, 2015 05:24 IST