हा भुयारी मार्ग एरंडवणा भागात आहे. कोरोनामुळे देशभरात टाळेबंदी लागू करण्यात आली होती. त्यामुळे हा भुयारी मार्ग बंद करण्यात आला होता. हा मार्ग बंद असल्याने स्थानिक नागरिक, जेष्ठ नागरिक,महिला यांची खूप गैरसोय होत होती. त्यामुळे नागरिकांना मुख्य रस्त्याच्या वापर करावा लागत होता. किरकोळ स्वरुपाचे अपघात या ठिकाणी घडले. त्यामुळे हा मार्ग नागरिकांसाठी खुला करण्यात यावा अशी मागणी नगरसेवक दीपक पोटे यांनी केली होती. त्यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे हा मार्ग खुला करण्यात आला आहे. भुयारी मार्गाची स्वच्छता करण्यात आली असून नागरिकांच्या सुरक्षितेसाठी दोन सुरक्षारक्षकांची नियुक्ती करण्यात आल्याचे नगरसेवक पोटे यांनी सांगितले.
स्वरतीर्थ सुधीर फडके भुयारी मार्ग झाला खुला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2020 04:08 IST