शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

चाकण शहरासह ग्रामीण भागात वाढला स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2018 00:44 IST

काळजी घेण्याचे आवाहन; एकाच महिन्यात तीन बळी गेल्याने वाढली चिंता, प्रशासन ढिम्म

आंबेठाण : चाकणसह ग्रामीण भागात पुन्हा एकदा स्वाइन फ्लूने चांगलेच डोके वर काढले असून, आतापर्यंत दोन महिलांसह एका तरुणाचा या गंभीर आजाराने बळी गेला आहे. या तिन्ही रुग्णांचा स्वाइन फ्लूने उपचारादरम्यान मृत्यू झाला असून, आरोग्य विभागाने हे बळी जाऊन कुठल्याही प्रकारची उपाययोजना केल्या नसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.भरत शिवळे (वय ३४, रा. म्हाळुंगे) या तरुणासह अनिता सिंग (वय ३०, रा. मेदनकरवाडी), शर्मिला कड (वय ३५, रा. कडाचीवाडी) असे मृत्यू झालेल्या महिलांची नावे आहेत. हे तिन्ही बळी एक महिन्यात स्वाईन फ्लूने गेले आहेत. या रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्यापासून त्यांना कृत्रिम श्वासोच्छ्वासावर (व्हेंटिलेटर) ठेवण्यात आले होते. वैद्यकीय अहवालामध्ये संबंधितांना स्वाईन फ्लू झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यामुळे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्याकरिता जनजागृती करण्याची गरज आहे. हा आजार आटोक्यात आणण्यासाठी चाकण ग्रामीण रुग्णालयात स्वाईन फ्लूप्रतिबंधक लसीचा साठा तत्काळ मोफत उपलब्ध करून देण्याची गरज आहे. या आजाराबाबत स्थानिक प्रशासन, आरोग्य विभाग आणि ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर यांनी दक्षता व जनजागृती करण्याची गरज निर्माण झाली आहे. मात्र, खेड तालुक्यातील वैद्यकीय विभाग सर्व काही आलबेल असल्याच्या अविर्भावात आहेत.वैद्यकीय अधीक्षक म्हणतात...वैद्यकीय अधीक्षक डॉ. माधव कणकवले यांनी सांगितले, की सर्दी, खोकला, ताप असेल तर शक्यतो कामावर जाऊ नये, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, खोकताना, शिकताना तोंडाला रुमाल लावावा, धूम्रपानाच्या सवयीमुळे श्वसनशक्ती कमी होते. त्या विषाणूचे प्रवेशद्वार श्वासनलिका आहे, नाकाच्या आणि घशातील स्रावातील थेंबामुळे हा आजार पसरतो. खोकताना, शिकताना हे थेंब इकडेतिकडे पडतात. हात सातत्याने साबण व पाण्याने धुवावेत. पौष्टिक आहार घ्यावा, हिरव्या पालेभाज्या खाव्यात.तालुक्यातील सर्व वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. स्वाइन फ्लूचा रुग्ण आढळल्यास त्वरित औषधोपचार सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ग्रामीण भागातील सर्व आरोग्य केंद्रात स्वाईन फ्लूची औषधे उपलब्ध करून दिली आहेत. - साहिल गोरे, तालुका वैद्यकीय अधिकारी.

टॅग्स :Swine Flueस्वाईन फ्लूChakanचाकण