शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

‘स्मार्ट सिटी’साठी ‘एसव्हीपी’ कंपनी

By admin | Updated: January 10, 2017 03:25 IST

पिंपरी-चिंचवड शहरात ‘स्मार्ट सिटी’ प्रकल्प राबविण्यासाठी स्पेशल पर्पज व्हेइकल (एसपीव्ही) कंपनी स्थापन करणे आवश्यक असून

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात ‘स्मार्ट सिटी’ प्रकल्प राबविण्यासाठी स्पेशल पर्पज व्हेइकल (एसपीव्ही) कंपनी स्थापन करणे आवश्यक असून, ही कंपनी स्थापन करण्याचे आदेश राज्य सरकारने पिंपरी-चिंचवड महापालिकेला दिले आहेत. कंपनी अधिनियमांतर्गत स्थापन करण्यात आलेली एसपीव्ही ही शासकीय कंपनी असेल. या कंपनीचे अध्यक्ष नगरविकास विभागाचे प्रधान सचिव नितीन करीर हे असतील. तसेच, महापालिकेचे आयुक्त, महापौर, उपमहापौर, स्थायी समिती अध्यक्ष, सभागृह नेता आणि विरोधी पक्षनेता यांच्यासह सत्ताधारी वगळून इतर दोन राजकीय पक्षांचा प्रत्येकी एक नगरसेवक या कंपनीचे संचालक असणार आहेत. तर, शासनाचे प्रतिनिधी म्हणून तर पुण्याचे विभागीय आयुक्त, पोलीस आयुक्त, पीएमपीचे अध्यक्ष हे कंपनीचे संचालक असतील. तसेच केंद्र शासनाचा एक प्रतिनिधी, केंद्रीय कंपनी व्यवहाराचे दोन स्वतंत्र संचालक असतील. यासह एसव्हीपीचे मुख्य कार्यकारी अधिकारी असतील. ही कंपनी स्थापन करण्याचे आदेश सरकारने महापालिकेला दिले आहेत. या कंपनीचे नाव ठरविण्याचे अधिकार महापालिका आयुक्तांना देण्यात आले आहेत. तसेच, कंपनीचे मुख्यालय पिंपरी-चिंचवड महापालिकेतच असणार आहे.(प्रतिनिधी)४कंपनीला राज्य शासनाचे खरेदीविषयक धोरण लागू राहणार आहे. विविध प्रकल्पांसाठी महापालिकेच्या मान्यतेने कर्ज उभे करण्याची मुभा असून कर्जाची संपूर्ण जबाबदारी कंपनीची आणि महापालिकेची असेल. या कर्जाची सरकार कोणतीही हमी घेणार नाही. स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत पीपीपी तत्त्वावर राबविण्यात येणारया ५० कोटींपेक्षा अधिक रकमेच्या प्रकल्पांना शासनाच्या उच्चाधिकार समितीची पूर्वमान्यता घ्यावी लागणार आहे. एसपीव्ही कंपनीला मुख्य कार्यकारी अधिकारी नेमावा लागणार असून, अधिकारी भारतीय प्रशासकीय सेवेतील असणे आवश्यक आहे.