शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक यंत्रणेवरच संशय

By admin | Updated: February 9, 2017 03:36 IST

महापालिका निवडणुकीतील प्रभाग ७ ड मधील उमेदवार रेश्मा भोसले यांची अपक्ष म्हणूनच उमेदवारी ग्राह्य धरण्यात यावी, असे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत

पुणे : महापालिका निवडणुकीतील प्रभाग ७ ड मधील उमेदवार रेश्मा भोसले यांची अपक्ष म्हणूनच उमेदवारी ग्राह्य धरण्यात यावी, असे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्याचबरोबर त्यांना भाजपाची उमेदवारी देण्याचा निर्णय न्यायालयाने स्थगित ठेवला आहे. एका उमेदवारासाठी विशेष बाब म्हणून सर्व प्रशासकीय यंत्रणा चुकीच्या पद्धतीने राबविण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. इतरही प्रभागात राजकीय दबावाने निवडणूक यंत्रणेने काम केल्याचा आरोप विविध राजकीय पक्षांनी केला. भोसले यांनी भाजपाकडून भरलेल्या उमेदवारी अर्जात विसंगती आढळून आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी विजया पांगारकर यांनी अपक्ष ठरविले होते. मात्र महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी राज्य निवडणूक आयोगाला पत्र पाठविल्यावर भाजपाची उमेदवारी बहाल करण्यात आली होती. या निर्णयाविरोधात काँग्रेसचे उमेदवार दत्ता बहिरट यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. अर्जाबाबत निर्णयाचे संपूर्ण अधिकार निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना देण्यात आले असताना हस्तक्षेप करण्यात आल्याचे अ‍ॅड. अंतूरकर यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले. त्यामुळे अपक्ष म्हणूनच उमेदवारी अर्ज ग्राह्य धरण्यात यावा, असा निर्णय न्यायालयाने दिला आहे. या निर्णयामुळे भाजपाचा पर्दाफाश झाला असून जनतेचा विजय झाला आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी व्यक्त केली. न्यायालयाच्या निर्णयातून आयुक्त भाजपासाठी काम करीत असल्याचे दिसते, असे बहिरट यांनी सांगितले. भवानी पेठ कार्यालयात राजकीय हस्तक्षेपाचा आरोपपुणे : उमेदवारी अर्ज रद्द करण्याबाबत भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयातील निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी घेतलेल्या निर्णयावर उमेदवारांकडून शंका व्यक्त केली जात आहे. राजकीय हस्तक्षेपातून काही प्रभागांमध्ये किरकोळ कारणांवरून अर्ज रद्द केले असल्याची तक्रार करण्यात येत आहे.भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयातील प्रभाग क्रमांक १९ ब मध्ये काँग्रेसच्या सुनीता जगन्नाथ लडकत, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नसीम अन्वर शेख व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वंदना सिद्राम जन्नू या तीन महिलांचे अर्ज रद्द करण्यात आले. सुनीता लडकत यांचा अर्ज त्यांच्या जात प्रमाणपत्र पडताळणी दाखल्यावर माहेरचे नाव आहे, विवाहानंतर नाव बदललेले असल्याचा पुरावा दिलेला नाही, या कारणावरून फेटाळण्यात आला. हेच कारण सांगत जन्नू व नसीम शेख यांचेही अर्ज रद्द करण्यात आले. त्यामुळे ते निवडणुकीतून बाद झाले.आपण सर्व आवश्यक कागदपत्रे जोडली होती, मात्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी ती पाहिलीच नाहीत, न पाहताच त्यांनी उमेदवारी अर्ज बाद केले, त्यावर कोणीही अन्य उमेदवार किंवा त्याच्या कार्यकर्त्याने हरकतही घेतलेली नव्हती, असे या महिलांचे म्हणणे आहे. जात पडताळणी प्रमाणपत्रावरचे नाव माहेरचे असणे स्वाभाविक आहे, ते विवाहानंतर बदलले असल्याचे व त्यासंबंधीचा अर्ज केला असल्याचे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणल्यानंतरही अर्ज रद्द करण्यात आले, अशी त्यांची तक्रार आहे. तीन महत्त्वाच्या राजकीय पक्षांचे अर्ज बाद करण्यामागे राजकीय हात असल्याचा या तिन्ही महिलांचा आरोप आहे. या प्रभागात फक्त भाजपाच्या मनीषा लडकत व शिवसेनेच्या भारती दामजी व अन्य एक महिला असे तीनच अर्ज शिल्लक राहिले यावरून त्याला पुष्टी मिळत असल्याचे अर्ज रद्द करण्यात आलेल्या तिन्ही महिला उमेदवारांचे म्हणणे आहे. त्यापैकी लडकत यांनी न्यायालयात दाद मागितली असून अन्य दोन उमेदवारही त्याच तयारीत आहेत.