शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

वेळेत काम न केल्यास अधिकाऱ्यांचे निलंबन

By admin | Updated: July 16, 2016 01:19 IST

सिंहगड रस्त्यावरील विश्रांतीनगर ते सिंहगड कॉलेज या रस्त्यावरील वाहतुकीची कोंडी अधिकारी काम करीत नसल्यामुळे होत आहे

पुणे : सिंहगड रस्त्यावरील विश्रांतीनगर ते सिंहगड कॉलेज या रस्त्यावरील वाहतुकीची कोंडी अधिकारी काम करीत नसल्यामुळे होत आहे. रस्तारुंदीकरणासाठी लागणाऱ्या जागेचे संपादन येत्या १० आॅगस्टपर्यंत झाले नाही, तर संबंधित अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात येईल, असे आदेश आयुक्त कुणाल कुमार यांनी दिले. काम पूर्ण करून घेण्याची जबाबदारी आयुक्तांनी पालिकेच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांवर सोपविली आहे.या रस्त्याच्यासंदर्भात स्थानिक नगरसेविका मंजूषा नागपुरे गेल्या काही वर्षांपासून प्रयत्न करीत आहे. वर्षभरापूर्वी पालकमंत्री गिरीश बापट, आमदार माधुरी मिसाळ यांनी याबाबत अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली होती, मात्र त्यानंतर काहीच हालचाल झाली नाही. त्यामुळे नागपुरे यांनी आयुक्तांकडे तक्रार केल्यानंतर शुक्रवारी त्याबाबत बैठक झाली. शहर अभियंता प्रशांत वाघमारे, पथ विभागाचे मुख्य अभियंता राजेंद्र राऊत, तसेच नागपुरे, सामाजिक कार्यकर्ते दीपक नागपुरे, स्थानिक नागरिक मिलिंद पवार, अंजली जोशी, भारती भांबरे, सतीश वाघोलीकर, सुधाकर माडगे आदी बैठकीला उपस्थित होते. वर्षभरापूर्वी झालेल्या बैठकीतील चर्चेचा मागोवा घेण्यात आला असता एकही काम झाले नसल्याचे निदर्शनास आले.नगरसेविका नागपुरे यांनी सांगितले, की विकास आराखड्यात हा रस्ता तब्बल १८ मीटरचा दर्शविण्यात आला आहे. प्रत्यक्षात त्याची सध्याची रुंदी आठ मीटरपेक्षाही कमी आहे. प्रशासनाला वारंवार सांगितल्यानंतरही रस्ता रुंद करण्याबाबत काही होत नाही, ही खेदाची बाब आहे. बैठकीत वाघमारे तसेच राऊत यांनीही अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेबाबत नाराजी व्यक्त केली. नागपुरे यांनी नंतर आयुक्तांना बैठकीची माहिती दिली, त्यावर त्यांनी १० आॅगस्टची मुदत देऊन तोपर्यंत काम झाले नाही तर संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात येईल, असे सांगितले.या वेळी पालिका आयुक्तांनी शहर अभियंता व पथ विभागाचे अधीक्षक अभियंता राजेंद्र राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली दहा आॅगस्टपर्यंत रस्त्याचे रुंदीकरण करण्याची सूचना केली. रस्त्याचे रुंदीकरण वेळेत पूर्ण न केल्यास संबंधितावर कारवाई करण्याचा इशारा या वेळी आयुक्तांनी दिला. या बैठकीला भाजपाचे दीपक नागपुरे, अ‍ॅड. मिलिंद पवार, अंजली जोशी, भारती भांबरे, सतीश वाघोलीकर, सुधाकर मांडगे आदी उपस्थित होते.