शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

शिवीगाळ करणारा उपनिरीक्षक निलंबित

By admin | Updated: April 11, 2017 03:56 IST

रात्री उशिरापर्यंत हॉटेल सुरू ठेवून देण्यासाठी; तसेच कारवाई न करण्यासाठी हप्त्याची मागणी करीत हॉटेलचालकाला अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करीत धमकावणाऱ्या

पुणे : रात्री उशिरापर्यंत हॉटेल सुरू ठेवून देण्यासाठी; तसेच कारवाई न करण्यासाठी हप्त्याची मागणी करीत हॉटेलचालकाला अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करीत धमकावणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक विलास गुजर यांना पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला आणि सह पोलीस आयुक्त सुनील रामानंद यांनी निलंबित केले आहे. लष्कर भागातील एम. जी. रस्त्यावरच्या एका हॉटेलचालकाकडे गुजर मागील काही दिवसांपासून दरमहा हप्त्यांची मागणी करीत होते; मात्र हॉटेलचालकाकडून कोणताही प्रतिसाद मिळत नाही, असे दिसताच कारवाईसाठी हॉटेलवर गेलेल्या गुजर यांनी मालकाला फोन करून शिवीगाळ करीत धमकवायला सुरुवात केली होती. अर्वाच्च भाषेतील या शिव्या खाऊनही हॉटेल -चालक त्याला पैसे देण्यास तयार आहे, असे वारंवार सांगत असतानाही ‘पोलीस आयुक्त, सह आयुक्त कोणालाही जाऊन सांग, मी पैसे मागितले’ अशी मग्रुरी त्यांनी दाखवली. माझ्या सोबतच्या दुसऱ्या अधिकाऱ्यांना पैसे देतोस, कर्मचाऱ्यांना पैसे देतोस, मला का देत नाहीस, असे दरडावून विचारत दमात घेण्याचा प्रयत्न केला होता. या संपूर्ण संभाषणाच्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड झालेल्या दोन आॅडिओ क्लिप्स ‘लोकमत’च्या हाती लागल्या होत्या. यासंदर्भात सोमवारच्या अंकात सविस्तर वृत्त प्रसिद्ध होताच पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी परिमंडल दोनचे उपायुक्त पंकज डहाणे यांना चौकशीचे आदेश दिले. डहाणे यांनी लष्कर विभागाचे सहायक आयुक्त नीलेश मोरे यांना चौकशी करून एक दिवसाच्या आतमध्ये पोलीस आयुक्तांना अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार, आॅडिओ क्लिपसह अन्य बाबींची चौकशी करून त्यांनी वरिष्ठांना अहवाल सादर केला. या अहवालामध्ये गुजर यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे. पोलीस आयुक्त आणि सह आयुक्तांनी याबाबत निर्णय घेऊन गुजर यांना निलंबित केले आहे. सोमवारी संध्याकाळी याबाबतचे आदेश देण्यात आले. लष्कर पोलीस ठाण्याच्या सेंट्रल स्ट्रीट पोलीस चौकीमध्ये नेमणुकीस असलेल्या गुजर यांच्या अरेरावीबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध करताच त्याची आयुक्त शुक्ला आणि सह आयुक्त रामानंद यांनी गंभीर दखल घेत २४ तासांच्या आतमध्ये ही कारवाई केली.