शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

अश्लील वर्तन करणाऱ्या उपप्राचार्यास अटक

By admin | Updated: November 20, 2014 04:22 IST

माऊंट सेंट पॅट्रीक विद्यालयाच्या उपप्राचार्यास अल्पवयीन विद्यार्थिंनीसोबत अश्लील वर्तन केल्याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी अटक केली आहे.

येरवडा : माऊंट सेंट पॅट्रीक विद्यालयाच्या उपप्राचार्यास अल्पवयीन विद्यार्थिंनीसोबत अश्लील वर्तन केल्याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी अटक केली आहे. ब्रदर सुरेश जॉन पॉल (वय ३०, रा. लोहगाव, मूळ तमिळनाडू) असे या आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध बाललैंगिंक अत्याचार प्रतिबंधक (पास्को) कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला न्यायालयाने २४ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. याबाबत माहिती अशी, लोहगाव-वाघोली रस्त्यावर असणाऱ्या वॉटरपार्कजवळील माऊंट सेंट पॅट्रीक विद्यालयातील उपप्राचार्य हा काही विद्यार्थिंनीबरोबर अश्लील वर्तन करत असल्याची तक्रार विद्यार्थिंनीनी पालकांकडे केली होती. संबंधित उपप्राचार्याविरोधात तक्रार करण्यासाठी पीडित विद्यार्थिंनीचे पालक मंगळवारी सकाळी शाळेत गेले होते. या संदर्भात चौकशी करून कारवाई करू, असे शाळा प्रशासनाने पालकांना सांगितले. या संदर्भात संबंधित उपप्राचार्याविरोधात अनेक विद्यार्थिंनीसोबत अश्लील वर्तन केल्याचे उघडकीस आल्यावर, पीडित विद्यार्थिनीच्या पालकांनी पोलिसांकडे तक्रार देण्याचा निर्णय घेतला. तर शाळा प्रशासनाने माफी मागून तक्रार दाखल करू नये, यासाठी सारवासारव केली. या संदर्भात लोहगाव परिसरातील स्थानिक कार्यकर्ते समीर खांदवे-पाटील यांनी वाचा फोडली असता, पोलिसांनी तत्काळ शाळेत धाव घेतली. पीडित विद्यार्थिनी व तिच्या पालकांशी चर्चा करून त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार शाळेच्या उपप्राचार्याविरोधात पास्को कायद्यानुसार गुन्हा दाखल करून संबंधित उपप्राचार्याला तत्काळ अटक केली. (प्रतिनिधी)