शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

वर्षाला एक हजार वाहन परवाने निलंबित

By admin | Updated: February 11, 2016 03:16 IST

मद्यपान करून वाहन चालविणे आणि वाहन चालविताना मोबाईलवर बोलणे पुणेकरांना चांगलेच महागात पडत आहे. वाहतुकीचे नियम धुडकावणाऱ्या अशा तब्बल तीन हजार बेशिस्त

पुणे : मद्यपान करून वाहन चालविणे आणि वाहन चालविताना मोबाईलवर बोलणे पुणेकरांना चांगलेच महागात पडत आहे. वाहतुकीचे नियम धुडकावणाऱ्या अशा तब्बल तीन हजार बेशिस्त वाहनचालकांवर गेल्या तीन वर्षांत कारवाई करण्यात आली आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार, या वाहनचालकांचे परवाने सहा महिन्यांसाठी निलंबित करण्यात येतात.गेल्या काही वर्षात शहरातील सार्वजनिक वाहनांचा आकडा २५ लाखांच्या वर गेला आहे. त्यात प्रामुख्याने दुचाकी वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. या वाहनांमधील जवळपास ७० ते ७५ टक्के वाहने दररोज शहरातील रस्त्यांवर धावत असतात. मात्र, यातील अनेक वाहनचालक राजरोसपणे नियम धाब्यावर बसवून मद्य प्राशन करून तसेच मोबाइलवर बोलत वाहने चालवितात. शहरात वाहतूक पोलिसांकडून अशा वाहनचालकांवर कारवाई केली जाते. गेल्या तीन वर्षांत तब्बल ४ हजार ३५३ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली असून, त्यातील ३ हजार चालकांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. ही आकडेवारी पाहता वर्षाला एक हजार तर दर दिवशी अवघ्या तीन जणांचे परवाने निलंबित होत असल्याचे दिसून येते. (प्रतिनिधी)केवळ महापालिका हद्दीतच कारवाईवाहतूक पोलिसांकडून करण्यात आलेली ही तीन वर्षांतील कारवाई केवळ महापालिकेच्या हद्दीतच आहे. यावरून ग्रामीण भागात मोबाइल संभाषण तसेच ड्रंक अँड ड्राइव्हची कारवाईच होत नसल्याचे यावरून दिसून येते. तर प्रादेशिक परिवहन विभागाकडे असलेल्या माहितीनुसार, त्यांच्याकडूनही गेल्या तीन वर्षांत मोठ्या प्रमाणात शहरी भागातील परवानेच निलंबित करण्यात आल्याची माहिती आहे. प्रादेशिक परिवहन विभागाच्या कार्यालय क्षेत्रात कारवाई झाल्याचे या माहितीवरून दिसून येत नाही.तीन हजार परवाने निलंबित वाहतूक पोलिसांकडून १ एप्रिल २०१३ ते ८ फेब्रुवारी २०१६ या तीन वर्षांच्या कालावधीत तब्बल ४ हजार ३५३ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली होती. त्यांच्यावर खटले दाखल करण्यात आल्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार, सुमारे २९९९ वाहनचालकांचे परवाने सहा महिन्यांसाठी निलंबित करण्यात आले होते. हा निलंबनाचा कालावधी संपल्यानंतर या वाहनचालकांची पुन्हा वाहन चालविण्याची चाचणी घेऊन त्यांना नवीन परवाने दिले जातात. त्यातील जवळपास २ हजार वाहनचालकांना पुन्हा नवीन परवाने देण्यात आले आहेत.दिवसाला चार जणांवर कारवाई प्रादेशिक परिवहन विभागाकडे असलेल्या कारवाईची आकडेवारी पाहता दररोज रस्त्यावर २० ते २५ लाख वाहने असताना, त्यातील ड्रंक अँड ड्राइव्ह आणि मोबाइल संभाषण करणाऱ्या अवघ्या तीन ते चार जणांवर दर दिवशी कारवाई करण्यात येत असल्याचे दिसून येते. दर वर्षी केवळ ३१ डिसेंबर रोजीच पोलिसांकडून कारवाई करण्यात येते. इतर दिवशी केवळ सिग्नल तोडणे अथवा नो पार्किंगमधील वाहनांवर कारवाई करण्यातच पोलिसांकडून धन्यता मानली जाते.