शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

निलंबित हनुमंत नाझीरकरला ‘लाचलुचपत’ने केली अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : उत्पन्नापेक्षा अधिक मालमत्ता बाळगल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केलेल्या अमरावती विभागाच्या नगर रचना ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : उत्पन्नापेक्षा अधिक मालमत्ता बाळगल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केलेल्या अमरावती विभागाच्या नगर रचना विभागाचे निलंबित सहसंचालक हनुमंत नाझीरकर याला आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. दोन वर्षांपूर्वी हनुमंत नाझीरकर याच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अलंकार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. त्याप्रकरणात बारामती पोलिसांकडून नाझीरकर याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज ताब्यात घेतले.

गेली अनेक महिने हनुमंत नाझीरकर हा पोलिसांना हुलकावणी देत होता. सुमारे १० दिवसांपूर्वी ग्रामीण पोलिसांनी त्याला महाबळेश्वर येथे पकडले होते. त्याच्याविरुद्ध बारामती पोलीस ठाण्यात फळविक्रेत्याची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल होता. त्यात त्याला अटक केली. याबाबत पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांनी सांगितले की, गेले ८ दिवस हनुमंत नाझीरकर हा पोलीस कोठडीत होता. या काळात त्याच्याकडून अनेक बोगस नोटरी मिळाला आहे. गुन्ह्यातील सबळ पुरावा आम्ही मिळविला आहे. त्याची आज पोलीस कोठडी संपत असल्याने त्याला न्यायालयात हजर केले होते. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने न्यायालयाच्या आदेशानुसार त्याला ताब्यात घेतले आहे.

बारामती शहर पोलिसांकडून नाझीरकर याला ताब्यात घेऊन सायंकाळी पुण्यात आणण्यात आले. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली आहे. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या उघड चौकशीत हनुमंत नाझीरकर याच्याकडे उत्पन्नापेक्षा २ कोटी ७५ लाख रुपयांची बेहिशेबी मालमत्ता आढळून आली होती. त्यामुळे हनुमंत नाझीरकर (वय ५३), पत्नी संगीता (वय ४५), मुलगी गीतांजली (वय २३) आणि मुलगा भास्कर (वय २३, सर्व रा. स्वप्नशिल्प सोसायटी, कोथरुड) यांच्यावर अलंकार पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला होता.

या गुन्ह्याचा तपास करीत असताना नाझीरकर याने नातेवाईकांच्या नावाने आणखी बरीच मालमत्ता खरेदी केली असल्याचे आढळून आले. ती सर्व बेनामी संपत्ती असून ती सुमारे १५० कोटींहून अधिक असल्याचा संशय आहे. ही मालमत्ता बेनामी असल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने याची माहिती आयकर विभागाला दिली असून त्यांच्याकडून याची चौकशी सुरु आहे.