शहरं
Join us  
Trending Stories
1
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
2
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
3
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
4
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
5
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
6
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
7
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
8
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
9
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
10
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
11
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
12
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
13
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
14
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
15
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
16
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...
17
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
18
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'
19
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
20
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम

शिक्षण मंडळाच्या अधीक्षकांसह ५ कर्मचारी निलंबित

By admin | Updated: May 3, 2016 03:42 IST

महापालिका शिक्षण मंडळाच्या शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी खरेदी केलेल्या स्वेटरचा दर्जा व किंमत यामध्ये तफावत असणे, योग्य पद्धतीने प्रक्रिया न राबविणे याप्रकरणी शिक्षण मंडळाच्या

पुणे : महापालिका शिक्षण मंडळाच्या शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी खरेदी केलेल्या स्वेटरचा दर्जा व किंमत यामध्ये तफावत असणे, योग्य पद्धतीने प्रक्रिया न राबविणे याप्रकरणी शिक्षण मंडळाच्या अधीक्षकांसह ५ कर्मचाऱ्यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. शक्षण मंडळाच्या शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी वुलनचे स्वेटर पुरविण्याचा ठेका देण्यात आला होता. त्यासाठी एका स्वेटरसाठी सरासरी ४०० रुपयांचा दर देण्यात आला. मात्र वुलनचे स्वेटर न पुरविता ठेकेदाराने सिंथेटिकचे स्वेटर दिले आहेत, त्याची किंमत बाजारामध्ये खूपच कमी असल्याची तक्रार विनायक फडके यांनी महापालिकेचे आयुक्त कुणाल कुमार यांच्याकडे केली होती. या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वीच शिक्षण मंडळाचे प्रमुख बबन दहिफळे यांना महापालिकेच्या सेवेतून मुक्त करण्यात आले होते. त्याचबरोबर या खरेदीप्रक्रियेत सहभागी असलेले शिक्षण मंडळाचे अधीक्षक, वरिष्ठ लिपीक अशा ५ कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आल्याची माहिती महापालिकेचे आयुक्त कुणाल कुमार यांनी दिली. फडके यांनी या स्वेटरची प्रयोगशाळेतून तपासणी करून घेतली. त्याच्या अहवालामध्ये ठेकेदाराने पुरविलेल्या स्वेटर सिंथेटिक असल्याचे नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, स्वेटरप्रकरणी तक्रार आल्याने त्याचे बिल चौकशी होऊपर्यंत देऊ नये, अशी मागणी फडके यांनी केली होती, मात्र तरीही शिक्षण मंडळाकडून ठेकेदाराचे बिल आदा करण्यात आले होते. विनायक फडके यांच्या तक्रारीची गंभीर दखल घेऊन या प्रकरणाची सखोल कारवाई करण्याचे आदेश कुणाल कुमार यांनी दिले होते. त्यानंतर तत्कालीन शिक्षण मंडळाचे प्रमुख दहिफळे यांना नोटीस बजावण्यात आली होती. फडके यांनी केलेल्या तक्रारीची शहानिशा करण्यासाठी नव्याने सुनावणी घेण्याचे आदेशही आयुक्तांनी दिले होते. खरेदी प्रक्रियेत सहभागी असणाऱ्यांना आयुक्तांकडून नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. त्याचे समाधानकारक उत्तर न आल्याने त्यांनी निलंबनाची कारवाई केली आहे.