शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

तिसऱ्या रिंगरोड प्रस्तावाला स्थगिती

By admin | Updated: April 24, 2017 04:39 IST

पुणे शहराच्या वाहतुकीचा ताण सोडवण्याकरिता पहिले दोन रिंगरोड मंजूर असताना ते पूर्ण न करता नव्याने तिसऱ्या रिंगरोडचा

उरुळी कांचन : पुणे शहराच्या वाहतुकीचा ताण सोडवण्याकरिता पहिले दोन रिंगरोड मंजूर असताना ते पूर्ण न करता नव्याने तिसऱ्या रिंगरोडचा प्रस्ताव वडकी, लोणी काळभोर, आळंदी म्हातोबाची, सोरतापवाडी, कोरेगाव मूळ, पेठ, श्रीप्रयागधाम, बिवरी, वाडेबोल्हाई, बकोरी, लोणीकंद आदी गावातील शेतकरीवर्गावर अन्यायकारक असा तयार करून शासनाच्या अधिकारी यांच्यावर दबावतंत्र अवलंबून पूर्णत्वास नेण्याचा घाट घातला गेला होता. त्याला रिंगरोड शेतकरी दिलासा संस्थेने उच्च न्यायालयात जाऊन विरोध केला होता. त्यांची बाजू उचलून धरत उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे.पूर्व हवेलीतील तिसऱ्या रिंगरोड बाधित गावातील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन ‘रिंगरोड शेतकरी दिलासा संस्था’ स्थापन करून त्याद्वारे एम. एस. आर. डी. सी. व सरकारच्याविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. संस्थेच्या वतीने डॉ. अ‍ॅड. सुधाकर आव्हाड, अ‍ॅड. चेतन नागरे व सीनियर कौन्सिल अ‍ॅड. अनिल साखरे यांनी न्यायालयात बाजू मांडली.सुनावणीदरम्यान ‘रिंगरोड शेतकरी दिलासा संस्थेचे’ म्हणणे ग्राह्य धरून शासनाने ३०/११/२०१६ रोजी काढलेल्या यासंदर्भातील अधिसूचनेला पुढील आदेश मिळेपर्यंत उच्च न्यायालयाने स्थगिती देऊन या गावातील बाधित शेतकरीवर्गाला दिलासा दिला आहे. शेतकऱ्यांनी ‘रिंगरोड शेतकरी दिलासा संस्थेच्या’ कार्यालयासमोर गुढी उभारून आनंद व्यक्त केला.याप्रसंगी रिंगरोड शेतकरी दिलासा संस्थेचे अध्यक्ष रंगनाथ चोरघे, मणीभाई देसाई पतसंस्थेचे उपाध्यक्ष रामदास चौधरी, संस्थेचे सचिव व समन्वयक प्रभाकर कामठे, सोनबा चौधरी, पै. बाळासाहेब साबळे, रामदास कामठे, नितीन आंबेकर, सर्जेराव मोडक, माजी उपसरपंच गणेश चौधरी, श्रीपाद जवळकर, चित्रसेन जवळकर, अमोल भोसले, जिजाबा गोते-पाटील, जालिंदर घुले, शहाजी गोते, सुदाम गोते, विजय पायगुडे, ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र चौधरी, डॉ. जगताप, डॉ. चौधरी व इतरही अनेक शेतकरी उपस्थित होते.यापूर्वीचे दोन रिंगरोड दोनपैकी एक १९९७ मध्ये पीएमआरडीएच्या माध्यमातून मंजूर झालेला आहे, तर दुसरा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून सन २००३ मध्ये मंजूर झालेला आहे. यासाठी लागणारी सुमारे ९५% जमीन संपादित करण्यात आलेली आहे. या दोन्ही प्रस्तावाना सन २०१३ मध्ये शासनाने पुन्हा मंजुरी देऊनही अद्याप ते पूर्ण नाहीत, असे असताना हा तिसऱ्या रिंगरोडचा प्रस्ताव या भागातील शेतकऱ्यांवर अन्याय करणारा होता. (वार्ताहर)