शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

पीएमपीत आढळल्या संशयित बॅगा

By admin | Updated: February 15, 2016 02:47 IST

एका पीएमपी बसमधील सीटखाली दुपारी दोनच्या सुमारास आढळून आलेल्या दोन संशयित बॅगांमुळे सारसबागेजवळील स्वामी समर्थ मंदिराजवळ ही बस थांबवत सर्व प्रवाशांना खाली उतरवण्यात आले.

पुणे : एका पीएमपी बसमधील सीटखाली दुपारी दोनच्या सुमारास आढळून आलेल्या दोन संशयित बॅगांमुळे सारसबागेजवळील स्वामी समर्थ मंदिराजवळ ही बस थांबवत सर्व प्रवाशांना खाली उतरवण्यात आले. स्वा. सावरकर पुतळ्यापासून दांडेकर पुलाकडे जाणारी वाहतूक बंद करून बॉम्बशोधक व नाशक पथकाने तपासणी केली. तब्बल तासभर चाललेल्या या तपासणीमध्ये बॅगांमध्ये कपडे असल्याचे निष्पन्न झाल्यावर वाहतूक सुरू करण्यात आली.स्वा. सावरकर पुतळा चौकाकडून दांडेकर पुलाकडे जात असलेल्या पीएमपी बसमधील सर्वांत पाठीमागील सीटखाली एक सुटकेस आणि एक काळ्या रंगाची बॅग बेवारस अवस्थेत आढळून आली. याची माहिती प्रवाशांनी बसचे चालक व वाहक यांना दिली. त्यांनी तातडीने स्वामी समर्थ मंदिराच्या बाजूला ही बस घेतली. प्रवाशांना खाली उतरवण्यात आले. दरम्यान, पोलिसांना याची माहिती देण्यात आली. माहिती मिळताच स्वारगेट पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक दीपक निकम, दत्तवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक श्रीधर जाधव, सहायक निरीक्षक संदेश केंजळे, ए. एस. देशमाने आदी अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी स्वा. सावरकर पुतळा चौकाकडून येणारी वाहतूक थांबवली. मात्र दांडेकर पुलाकडून येणारी वाहतूक सुरळीत ठेवण्यात आली होती. बीडीडीएसचे पथक तत्काळ घटनास्थळी हजर झाले. सुरुवातीला श्वानपथकाच्या साहाय्याने बॅगांची तपासणी करण्यात आली. श्वानाने नकारात्मक इशारा केल्यानंतर स्कॅनरच्या मदतीने बॅगांची तपासणी करण्यात आली. त्यानंतर बॉम्ब सूट परिधान केलेल्या कर्मचाऱ्यांनी बसमध्ये जाऊन या दोन्हीही बॅगा उघडून पाहिल्या. तेव्हा या बॅगांमध्ये कपडे असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी घटनेची नोंद केली असून, बॅगा ताब्यात घेतल्या आहेत. तासभर चाललेल्या या तपासणीनंतर बस रवाना करून वाहतूक सुरळीत करण्यात आली.