शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

सर्व्हे झाले; उपाययोजनांचे काय?

By admin | Updated: May 10, 2017 03:48 IST

बारामती, पुरंदर; तसेच भोर तालुक्याला वरदान ठरलेल्या ब्रिटिशकालीन भाटघर आणि नीरा-देवघर या धरणांत मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कभोर : बारामती, पुरंदर; तसेच भोर तालुक्याला वरदान ठरलेल्या ब्रिटिशकालीन भाटघर आणि नीरा-देवघर या धरणांत मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. या नाशिकच्या महाराष्ट्र इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट सेंटर नाशिक (मेरी) या संस्थेने धरणातील गाळाचे सर्वेक्षण केले होते. मात्र, गाळ काढण्यासंदर्भात कुठल्याही हालचाली झाल्या नाहीत. धरणात जवळपास १० टक्के गाळ साचला असून, तो बाहेर काढल्यास पाणीसाठ्यात वाढ होणार आहे. भोर तालुक्यात १९२७ साली ब्रिटिशांनी वेळवंडी नदीवर भाटघर धरण बांधले. धरणाची पाणी साठवण क्षमता २२ टीएमसी असून, पाण्याचा फुगवटा सुमारे ५५ किलोमीटरपर्यंत पसरतो. धरण बांधून ९० वर्षे झाली. मात्र, अद्याप एकदाही धरणातील गाळ काढण्यासाठी उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. ग्रामीण भागातील उंचीवर असलेल्या डोंगर दऱ्यातील माती उताराने ओढे, माती, पालापाचोळा झाडेझुडपे दगडगोटे दरवर्षी पावसाच्या पाण्याबरोबर वाहून येतात. यामुळे धरणात गाळाचे थरच्या थर साचले आहे. धरणात सुमारे ८ ते १० टक्के गाळच साचला आहे. हा गाळ बाहेर काढला तर धरणातील पाणीसाठा वाढणार आहे. सध्या भाटघर धरणात १० टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. हा सर्व गाळ असून धरणाने तळ गाठला आहे. मात्र, धरणातील गाळ काढला तर हाच पाणीसाठा दुप्पट होणार आहे. त्याचा उपयोग पिण्याच्या पाण्यासाठी होणार आहे. नीरादेवघर धरण बांधून २० वर्षे झाली. धरणात १२ टीएमसी पाणीसाठा होतो. मात्र, मागील २० वर्षांत एकदाही गाळ काढला नसल्याने धरणात गाळाचे थर साचले आहेत. यामुळे धरणातील पाणीसाठा कमी दिसत आहे. सदरच्या दोन्ही धरणांतील गाळ काढल्यास धरणात ८ ते १० टक्के पाणीसाठा वाढणार आहे.धरणातील गाळ काढण्याचे सध्या शासनाचे धोरण असून, तसे झाल्यास भोर तालुक्यातील दोन्ही धरणांतील १५ ते २० टक्के पाणीसाठा वाढणार असून याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. मात्र, धरणातील गाळ काढणे गरजेचे आहे.