शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

मालमत्तेचे ड्रोनद्वारे सर्वेक्षण

By admin | Updated: April 27, 2017 04:44 IST

दौंड नगर परिषद हद्दीतील मालमत्तेचे सर्वेक्षण ड्रोनद्वारे करण्याचा महाराष्ट्रातून पहिला मान दौंड नगर परिषदेला मिळाला आहे.

दौंड : दौंड नगर परिषद हद्दीतील मालमत्तेचे सर्वेक्षण ड्रोनद्वारे करण्याचा महाराष्ट्रातून पहिला मान दौंड नगर परिषदेला मिळाला आहे. ड्रोनद्वारे सर्वेक्षणाचा पहिला टप्पा झाला असल्याची माहिती मुख्याधिकारी डॉ. विजयकुमार थोरात यांनी दिली.या कामाची पाहणी करण्याकरिता नगराध्यक्षा शीतल कटारिया यांच्यासह नगर परिषदेचे कर्मचारी येथील राज्य राखीव पोलीस बल गटाच्या परिसरात गेले होते. शहरातील मालमत्तांचे सर्वेक्षण व माहितीचे संकलन करून शहराचे ‘जीआयएस’ आधारित मालमत्ता सर्वेक्षण व कर आकारणी याचबरोबरीने पुढील नियोजन करण्याकरिता अद्ययावत उच्च दर्जाचे छायाचित्र आवश्यक असते. त्यानुसार हे छायाचित्र मिळविण्यासाठी मालमत्ता सर्वेक्षण, करमूल्यांकन करण्याचे काम करण्याकरिता नगर परिषदेद्वारे अमरावती येथील एका संस्थेची नियुक्ती करण्यात आलेली आहे. सर्वेक्षणामध्ये काही माहिती द्यावयाची राहून गेल्याचे निदर्शनास आल्यास अशा नागरिकांनी तातडीने दौंड नगर परिषदेकडे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. सर्वेक्षणाचे काम यशस्वीरित्या करण्याकरिता नगर परिषदेचे नगराध्यक्षा शीतल कटारिया, उपनगराध्यक्षा हेमलता परदेशी, मुख्याधिकारी डॉ. विजयकुमार थोरात, सर्व नगरसेवक, नगरसेविका, कर्मचारी आदींचे सहकार्य मिळाले.