शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

‘सर्जिकल’मुळे सैनिकांचे मनोबल वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2018 04:07 IST

आपले शेजारील राष्ट्र पाकिस्तानच्या वाढत्या कारवाया, दहशतवादी हल्ले यांना प्रत्युत्तर देणे गरजेचे होते. शांततामय अशा आपल्या प्रतिमेचा गैरफायदा घेणाऱ्या पाकिस्तानला धडा शिकवणे गरजेचे होते.

पुणे : आपले शेजारील राष्ट्र पाकिस्तानच्या वाढत्या कारवाया, दहशतवादी हल्ले यांना प्रत्युत्तर देणे गरजेचे होते. शांततामय अशा आपल्या प्रतिमेचा गैरफायदा घेणाऱ्या पाकिस्तानला धडा शिकवणे गरजेचे होते. आपण त्यांच्यापेक्षा कुठेही कमी नसून जम्मू काश्मीरमधील उरी येथे झालेल्या सर्जिकल स्ट्राइकमुळे सैनिकांचे मनोबल वाढल्याची माहिती केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी दिली.बालगंधर्व रंगमंदिरात येथे पार पडलेल्या एका कार्यक्रमाच्या निमित्ताने ते बोलत होते. सर्जिकल स्ट्राइकमध्ये सहभागी असलेले लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर यांचा सत्कार अहिर यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार विजय कुवळेकर उपस्थित होते. शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते. अहिर म्हणाले की, निंभोरकर यांच्या आजवरच्या कामगिरीत सर्जिकल स्ट्राइकचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. त्यांचे हे कार्य प्रेरणादायी आहे. शांतताप्रिय भूमिका स्वीकारणाºया भारताबद्दल शेजारील राष्ट्रांमध्ये मोठ्या प्रमाणात गैरसमज आहेत. स्वातंत्र्यप्राप्तीपासून पाकिस्तानच्या कारवाया आणि कुरापती सुरु आहेत. मात्र आपले सैन्य त्यांना पुरून उरले असून, जशास तसे उत्तर देण्यात निंभोरकर यांच्यासारख्यांचे योगदान महत्त्वाचे आहे.उरीमधील सैनिकांवर झालेला हल्ला हे आपल्यापुढे मोठे आव्हान होते. यामुळे एक प्रकारची भीती पसरली होती. सर्जिकल स्ट्राइकमुळे सैन्यात आत्मविश्वास निर्माण होण्यास मदत झाली. पाकिस्तान, बांगलादेश, चीन या देशांलगत असलेल्या सीमारेषेवर नियंत्रण ठेवण्यासाठी अधिक सतर्क राहावे लागणार असून, म्यानमारमधून भारतात येणाºया रोहिंग्याच्या संख्येवर काही प्रमाणात नियंत्रण मिळविले आहे.सत्काराला उत्तर देताना निंभोरकर यांनी युद्ध, युद्धातील थरारक प्रसंग, आठवणी यांना उजाळा दिला. सीमेवर देशासाठी शेवटच्या श्वासापर्यंत त्यांची लढण्याची प्रेरणा असामान्य असते. माणुसकी, आदेश पाळण्यासाठी जिवाची किंमत मोजणारे सैनिक, शब्दालाप्राणापेक्षा जास्त महत्त्व, बांधिलकीहे सगळे सैनिकांमध्ये पाहावयास मिळते. खासदार अनिल शिरोळे, महापौर मुक्ता टिळक, आबा बागुल, सतीश देसाई, संजय नहार, सुनील महाजन आदी मान्यवर श्रोत्यांमध्ये उपस्थित होते.