शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

मागणीच्या तुलनेत ऑक्सिजनचा पुरवठा कमीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : जिल्ह्यात ऑक्सिजनचा पुरवठा अद्यापही सुरळीत झालेला नाही. जिल्ह्याला रोज ३५० ते ३७० टन ऑक्सिजनची ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : जिल्ह्यात ऑक्सिजनचा पुरवठा अद्यापही सुरळीत झालेला नाही. जिल्ह्याला रोज ३५० ते ३७० टन ऑक्सिजनची आवश्यकता आहे. मात्र, प्रत्यक्षात ३०० ते ३१५ टन ऑक्सिजनचा पुरवठा रोज जिल्ह्याला होत आहे. ही तूट भरून काढण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे प्रयत्न सरू असून, मुंबई, ठाणे, मुरबाड तसेच परराज्यातून ऑक्सिजन टँकरद्वारे पुरवला जात आहे. शुक्रवारी काही गाड्यांमध्ये समस्या निर्माण झाल्याने ३१७ टन ऑक्सिजनचा पुरवठा जिल्ह्याला झाला.

जिल्ह्यासह राज्यातील अनेक शासकीय रुग्णालये, कोविड केअर सेंटर तसेच खासगी रुग्णालयांना ऑक्सिजनच्या तुटवड्याला सामोरे जावे लागत आहे. ऑक्सिजनचा तुटवडा भरून काढण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे शर्थीचे प्रयत्न केले जात आहे. मात्र, असे असतानाही पाहिजे त्या प्रमाणात अद्यापही ऑक्सिजनचा पुरवठा होत नसल्याने रुग्णांचे हाल सुरूच आहे. ऑक्सिजन नसल्याने पुणे शहरातील काही रुग्णांना नव्या रूग्णांना दाखल करून घेण्यास अडचणी आल्या होत्या. जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्येही ऑक्सिजनचा तुटवडा आहे. त्यात नवे प्रकल्प उभे राहण्यास विलंब लागत असल्याने त्यात आणखी भर पडत आहे.

ऑक्सिजन पुरवठा सुरळीत करण्यासाठी मुरबाड, मुंबई, ठाणे, जामनगर येथून टँकरच्या साह्याने जिल्ह्यात ऑक्सिजन आणले जात आहे. यातील काही टँकर वेळेवर पोहोचतात. मात्र, काही टँकर तांत्रिक कारणांमुळे वेळेत पोहोचू शकत नसल्याने हा तुटवडा निर्माण होत असल्याची माहिती अन्न व आैषध प्रशासन विभागाचे सहआयुक्त एस. बी. पाटील यांनी दिली.

जिल्ह्यात ऑक्सिजनचे नियोजन करण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय आणि अन्न व आैषध प्रशासन विभागातर्फे ऑक्सिजन पुरवठ्याचे नियोजन केले जाते. मात्र, रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने ऑक्सिजनच्या मागणीतही रोज वाढ होत आहे.

चौकट

पुण्यातील प्रकल्पांतून इतर जिल्ह्यांनाही पुरवठा

जिल्ह्यात आॅक्सिजन निर्मितीचे प्रमुख प्रकल्प आहेत, तर दोन एअर सेप्रेशन प्रकल्प आहेत. येथे निर्माण होणारा ऑक्सिजनचा पुरवठा जिल्ह्यासह आैरंगाबाद विभाग, अमरावती विभाग तसेच नागपूर विभागालाही केला जातो. यामुळे जिथे अतिरिक्त ऑक्सिजन आहे त्या ठिकाणाहून तो जिल्ह्याला पुरवला जातो. मात्र, त्या ठिकाणीही मागणी वाढल्याने ऑक्सिजनचा पुरवठा कमी प्रमाणात जिल्ह्याला होत आहे.