शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

पर्यवेक्षक अतिरिक्त ताणाखाली

By admin | Updated: November 23, 2015 00:39 IST

महापालिका शाळांच्या पर्यवेक्षकांवर एका वेळेस अनेक कामांचा अतिरिक्त ताण येत असल्यामुळे शिक्षण प्रशासनाबाबत कर्मचाऱ्यांमध्ये उदासीनता निर्माण आहे.

पिंपरी : महापालिका शाळांच्या पर्यवेक्षकांवर एका वेळेस अनेक कामांचा अतिरिक्त ताण येत असल्यामुळे शिक्षण प्रशासनाबाबत कर्मचाऱ्यांमध्ये उदासीनता निर्माण आहे. दिवसभर बैठका, अहवाल शासनाची कामे, वरिष्ठांचा आदेश अशा व्यस्त कामांमुळे पर्यवेक्षकांना शाळेमध्ये पायपीट करावी लागत आहे. पर्यवेक्षकांना वर्षभरामध्ये विविध प्रकारची शाळास्तरावरील कामे करावी पार पाडावी लागतात. पाठ्यपुस्तकांची बालभारतीकडून मागणी करणे, पुस्तकांचे शाळेत वेळेत १५ जूनपूर्वी वाटप करणे, शालाबाह्य मुलांची जबाबदारी, शासनाच्या यू-डायसमध्ये माहिती भरणे, शाळा तपासणी अशा एक ना अनेक प्रकारच्या कामांची जबाबदारी पर्यवेक्षकांच्या माथी मारली जात आहे. यामुळे पर्यवेक्षक अतिरिक्त ताणाखाली वावरत असल्याचे निदर्शनास आले आहे. प्रशासनाने बैठका बोलावल्या की, हातातील काम सोडून शिक्षण विभागात तत्काळ हजर राहावे लागत आहे. मीटिंग झाली की, बैठकीत दुसराच विषय मंजूर होतो. पहिले काम अर्धवटच राहते आणि दुसऱ्या कामाला लागावे लागते. पहिल्या कामासाठी पुन्हा दिवस संपून रात्र उजाडते, तरीही हातातले काम संपत नाही. यामुळे पर्यवेक्षकांवरचा कामाचा अतिरिक्त ताण वाढला आहे. आकृतिबंधानुसार पर्यवेक्षकांची गरज लक्षात घेता २७ पर्यवेक्षकांची गरज शिक्षण मंडळ प्रशासनाला आहे. २२ शाळांमागे एक पर्यवेक्षक असणे गरजेचे आहे. सध्या ५ पर्यवेक्षक आहेत. खासगी शाळा ४४८, तर मनपाच्या १४८ शाळा आहेत. तसेच मनपा शिक्षक संख्या १४९४ व खासगी शिक्षक संख्या ६६२५ आहे. तर मनपा विद्यार्थी संख्या ४९,२५३ आहे. खासगी विद्यार्थी संख्या २,५८,२७१ आहे. ही संख्यात्मक आकडेवारी लक्षात घेता पर्यवेक्षकांची संख्या त्या तुलनेत अपुरी आहे. शाळेतील विविध खेळ, तसेच विविध दिनविशेष साजरे करण्याचेही नियोजन वेगवेगळे असते. मतदार दिन, पल्स पोलिओ, हँडवॉश दिन, शिक्षक दिन, पर्यावरण दिन, लोकसंख्या दिन साजरे करण्यासाठी तयारी करणे. मुख्याध्यापक व शिक्षकांच्या सहविचार सभा घेणे, कुटुंब सर्वेक्षण सभेत सहविचार मार्गदर्शन करणे, खासगी शाळेतील २५ टक्के दुर्बल व आर्थिक दुर्बल घटकांतील प्रवेश प्रक्रिया प्रभावीपणे राबविणे, शालेय पोषण आहार कामकाज पाहणी करणे, शासकीय बैठकांना हजर राहणे, शिक्षण मंडळ बजेट तयार करून देणे, सरल प्रणालीत विद्यार्थ्यांचा डाटा भरणे आदी कामे करावी लागतात. (प्रतिनिधी)