शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सनसिटीत धमाल आनंदाची कमाल

By admin | Updated: May 31, 2017 02:48 IST

उन्हाळी सुट्या लागल्याने पूर्ण मोकळ्या वेळेचा आनंद लुटण्यासाठी सिंहगड परिसरातील विद्यार्थ्यांनी सनसिटी रस्त्यावर लोकमतच्या

उन्हाळी सुट्या लागल्याने पूर्ण मोकळ्या वेळेचा आनंद लुटण्यासाठी सिंहगड परिसरातील विद्यार्थ्यांनी सनसिटी रस्त्यावर लोकमतच्या धमाल गल्ली कार्यक्रमात सहभाग घेतला. रविवारी सकाळी सात ते साडेनऊ या वेळेत मुलेच नाही तर सर्वच वयोगटातील नागरिकांनी विविध खेळ खेळत धमाल केली. सकाळी सकाळी झालेली ही धम्माल लक्षणीय ठरली.रविवारची सकाळ सिंहगड रोड येथील सनसिटी येथे झालेल्या लोकमतच्या धमाल गल्लीच्या उपक्रमाने बालचमूंसाठी संस्मरणीय ठरली. या उपक्रमाला पालकांसह लहान मुलांनी प्रचंड गर्दीसह हजेरी लावली. तसेच यात विविध खेळांच्या मौजमस्तीची अनोखी पर्वणी अनुभवली.सनसिटी रोडवर रंगलेल्या धमाल गल्लीत स्केटिंग, फ्लॅश मॉब, रस्सीखेच, आर्ट, क्रॉफ्ट, बॉलिवूड डान्स, क्रिकेट, बँड परफॉर्मन्स, पुणेरी पगडी या कार्यक्रमांचा समावेश करण्यात आला. लहान मुलांसाठी अँग्री बर्ड्स, स्नेक्स अँड लॅडर, किड्स कॉर्नर, फेस पेंटिंग असे अनेक प्रकारचे खेळ ठेवण्यात आले.डीजेचा ठेका... जल्लोष आणि नृत्य अशी धमाल मुलांनी या धमाल गल्लीत केली. सहभागी झालेले लहान-थोर बक्षिसांचे मानकरी ठरले.पुढील धमाल गल्लीची रंगत न्यू डीपी रोड महेश विद्यालयासमोर, कोथरुड येथे दि. ४ व ११ जूनला सकाळी ७ ते ९:30 यादरम्यान अनुुभवता येईल. याकरिता सर्वांसाठी प्रवेश विनामूल्य राहील.एमआयटी पुणेतर्फे उपस्थितांना एटीवीची सवारी करण्याची संधी मिळाली.या कार्यक्रमाचे प्रायोजक मेपल ग्रुप व हिरो ड्युएट, फिटनेस पार्टनर-फिटनेस मंत्राज, एज्युकेशन पार्टनर- रोझरी, सहयोगी प्रायोजक - सायकल वर्ल्ड, ज्वेलरी पार्टनर - एच. पी. ज्वेलर्स, किड्स पार्टनर - युरो किड्स हे होते.लोकमत बालविकास मंच या कार्यक्रमाचे फोरम पार्टनर होते. या कार्यक्रमासाठी पुणे महापालिका, पुणे पोलीस व पुणे वाहतूक पोलीस यांचे सहकार्य लाभले.मुलांचे आई-वडीलही यात सहभागी झाले. नकळत लहानपणीच्या दिवसांची सैर यानिमित्ताने झाल्याची भावना अनेक पालकांनी व्यक्त केली. यानिमित्ताने विविध स्पर्धा आयोजिण्यात आल्या होत्या. यात आपल्या मुलांसोबत ज्येष्ठांनी धमाल केली. विजेत्या स्पर्धकांना बक्षिसांचे वाटप करण्यात आले. सकाळच्या उन्हात सापशिडीपासून अँग्री बर्ड्सपर्यंत, बुद्धिबळापासून क्रिकेटपर्यंत, सायकलिंगपासून मोपेड राईडपर्यंत सर्व काही जल्लोषमय होते. ‘झुंबा’द्वारे आरोग्याचामंत्रही देण्यात आला.