शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
4
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
5
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
6
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
7
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
8
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
9
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
10
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
11
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
12
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
13
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
14
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
15
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
16
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
17
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
18
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
19
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...

सूर्यकांत मांढरे कलादालनावर हातोडा

By admin | Updated: March 26, 2015 00:26 IST

मोठा गाजावाजा करीत लाखो रुपये खर्चून सहकारनगर येथे साकारण्यात आलेल्या ज्येष्ठ अभिनेते सूर्यकांत मांढरे कलादालनावर महापालिकेनेच हातोडा मारला आहे.

पुणे : मोठा गाजावाजा करीत लाखो रुपये खर्चून सहकारनगर येथे साकारण्यात आलेल्या ज्येष्ठ अभिनेते सूर्यकांत मांढरे कलादालनावर महापालिकेनेच हातोडा मारला आहे. मांढरे यांचे फोटो आणि त्यांना मिळालेली पारितोषिके अक्षरश: अडगळीत टाकण्यात आली आहेत. या प्रकाराने मांढरे यांच्या पत्नी सुशीला मांढरे यांना मानसिक धक्का बसला असून, या प्रकाराबाबत त्यांनी महापालिका आयुक्तांना पत्र लिहून खंत व्यक्त केली आहे. सहकारनगरातील वसंतराव बागुल उद्यानामधील पंडित भीमसेन जोशी कलादालनातील दुसऱ्या मजल्यावर मांढरे कलादालन साकारण्यात आले होते. या कलादालनाच्या ठिकाणीच भवन विभागाकडून स्केरी मिरर प्रकल्प उभारण्यात आला आहे.महापालिकेकडून २००९ मध्ये मांडरे यांचे कलादालन उभारण्यास मान्यता देण्यात आली. त्यानुसार, या ठिकाणी मांढरे यांच्या आठवणी जपण्यासाठी त्यांच्या कुटुंबीयांकडून मांढरे यांनी काढलेली पेंटिंग, त्यांचे फोटो तसेच त्यांना मिळालेले विविध पुरस्कार ठेवण्यासाठी त्यांच्या कुटुंबीयांशी करार करण्यात आला. त्यानुसार, या सर्व वस्तू कलादालनात लावण्यात आलेल्याही होत्या. तसेच गेल्या दोन वर्षांपासून या ठिकाणी भेट देणाऱ्या नागरिकांकडून त्याबाबत कौतुकही केले जात होते.मात्र, उपमहापौर आबा बागुल यांच्या प्रस्तावानुसार, या कलादालनात स्केरी मेझ (काचेच्या आरशांचा भुलभुलैया) करण्याचे काम भवन विभागाकडून हाती घेण्यात आले. तसेच या कामासाठी मांढरे यांचे फोटो तसेच त्यांची पारितोषिके काढून ती एका अडगळीत टाकण्यात आली आहेत. तर अनेक पारितोषिकेही गायब आहेत. ही बाब लक्षात आल्यानंतर मांढरे यांच्या पत्नी सुशीला मांढरे यांना धक्काच बसला आहे. त्यांनी या प्रकाराबाबत महापालिका आयुक्तांना पत्र लिहिले आहे. ही बाब अत्यंत अपमानास्पद असून, हे कलादालन तत्काळ आहे तसे करावे, अशी मागणी पत्राद्वारे आयुक्तांकडे केली आहे. (प्रतिनिधी)४सांस्कृतिक शहर असलेल्या पुण्यात एका कलाकाराच्या आठवणींचा असा अपमान होणे, ही बाब लज्जास्पद असून, या प्रकारास दोषी असलेल्यांवर कारवाई करण्याची मागणी भारतीय जनता युवा मोर्चाचे अध्यक्ष गणेश घोष यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी महापालिका आयुक्तांना दिले आहे. हे कलादालन पूर्ववत न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही दिला आहे. उपाध्यक्ष निहाल घोडके, शंतनू खिलारे या वेळी उपस्थित होते. आयुक्तांच्या आदेशाला वाटाण्याच्या अक्षता ४मांढरे कलादालनाची तोडफोड करून त्या ठिकाणी उभारण्यात येत असलेल्या मिररमेझबाबत मांडरे यांचा मुलगा प्रकाश मांढरे यांनी महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी भेट घेऊन नाराजी व्यक्त केली. त्यानंतर आयुक्तांनी तातडीने कार्यवाही करण्याबाबतचे आदेश २ मार्च रोजी मालमत्ता व व्यवस्थापन विभागास दिले. या पत्रानुसार, मालमत्ता विभागाने या कलादालनात सुरू असलेले मिररमेझचे काम थांबविले जावे अथवा त्याला स्थगिती दिली जावी यासाठीचे आदेश भवन विभागास दिले जावेत, यासाठीचा प्रस्ताव अतिरिक्त आयुक्त राजेंद्र जगताप यांच्यापुढे त्याच दिवशी ठेवला. मात्र, तो प्रस्तावही अडगळीत पडला असल्याचे समोर आले असून, आयुक्तांनी तातडीने कारवाई करण्याचे आदेश देऊनही गेल्या २२ दिवसांपासून या पत्रावर काहीच कारवाई झालेली नाही.कामाबाबतही घोळ ४प्रत्यक्षात हे मिररमेझ बांधण्याचे काम भवन विभागाकडून होणे अपेक्षित आहे. मात्र, भवन विभागाकडे चौकशी केली असता, हे काम तांत्रिक विभागाकडून करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. तर या विभागाच्या अधिकाऱ्यांकडे चौकशी केली असता, हे उद्यान विभागाचे काम असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे हे काम नेमके कोण करतेय, हा प्रश्न असून अतिरिक्त आयुक्त कोणाला काम थांबविण्याच्या सूचना देणार, असा सवाल या उपस्थित होत आहे.मांढरे यांचे कलादालन मिररमेझसाठी काढण्यात आले असले तरी, ते दुसऱ्या मजल्यावर राहील. कलादालनाबाबत मांढरे कुटुंबीयांसोबत कुठलाही करार झालेला नाही. ही गॅलरी दुसऱ्या मजल्यावर असल्याने ती पाहण्यासाठी कोणीही जात नाही. त्यामुळे त्या ठिकाणी भुलभुलैय्या करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे, तर मांढरे गॅलरी पहिल्या मजल्यावर हलविण्यात येणार आहे. - आबा बागुल, उपमहापौर