शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
3
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
4
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
5
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
6
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
7
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
8
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
9
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
10
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
11
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
12
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
13
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
14
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
15
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
16
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
17
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
18
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
19
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
20
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
Daily Top 2Weekly Top 5

सनबर्नने पोखरलाय डोंगऱ़!

By admin | Updated: December 24, 2016 00:19 IST

केसनंद (ता. हवेली) येथे दि. २८ ते ३१ डिसेंबर सनबर्न फेस्टिव्हलच्या आयोजनाचा घाट घातला असून गट नं. ६० व इतर गटात

कोरेगाव भीमा : केसनंद (ता. हवेली) येथे दि. २८ ते ३१ डिसेंबर सनबर्न फेस्टिव्हलच्या आयोजनाचा घाट घातला असून गट नं. ६० व इतर गटात मोठ्या प्रमाणावर उत्खनन व वृक्षतोड झालेली आहे. वनविभागाने कोणतीही परवानगी दिलेली नसताना हे प्रकार बिनबोभाट सुरू आहेत. त्याहीपेक्षा धक्कादायक म्हणजे, वृक्षतोड झालीच नसल्याचा आश्चर्यजनक खुलासा वनविभागच करीत आहे. फेस्टिव्हलच्या आयोजनासाठी जोगेश्वरी मंदिराच्या डोंगरावर बाऊन्सर्स व सुरक्षारक्षक तैनात केले असून पर्यटनासाठी जाणाऱ्या भाविकांना त्यांच्या दमबाजीला सामोरे जावे लागत आहे. शिवसेना युवा सेनेचे जिल्हा उपप्रमुख विपुल शितोळे यांनी यासंदर्भात आंदोलनाचा इशारा दिला आहे. केसनंद व पंचक्रोशीतील नागरिकांचे श्रद्धास्थान जोगेश्वरीमातेचे जागृत देवस्थान डोंगरावर आहे. मंदिराच्या मागील फेस्टिव्हलचे आयोजन केले असून तिथे फेस्टिव्हलची जय्यत तयारी चालू आहे. त्यासाठी वनविभागाच्या जागेतून रस्ता तयार करण्यात आला आहे. रस्त्यासाठी ३ मीटरची परवानगी असताना जवळपास ३० फुटांपेक्षा जास्त रस्ता बनविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर उत्खनन करण्यात आले आहे. जोगेश्वरीमातेच्या पवित्र डोंगरावर नशेच्या धुंदीत व मादक पदार्थांचे सेवन करून कार्यक्रम होणार असल्याने या फेस्टिव्हलला शिवसेना, मनसे, माहिती सेवा समिती, हिंदू जनजागृती समिती, तसेच हिंदू संघटनांनी विरोध केला आहे. पुण्यातही या फेस्टिव्हलविरोधात आंदोलन झाले आहे. विरोध लक्षात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी ठोस भूमिका घेण्याची गरज असल्याचे संघटनांच्या प्रतिनिधींनी सांगितले.