शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

‘सूर्यदत्ता’ने अनुभवली धम्माल मस्ती

By admin | Updated: February 22, 2017 03:17 IST

प्रचंड उत्सुकता, विद्यार्थ्यांच्या नजरा कॉलेजच्या प्रवेशद्वाराकडे, तेवढ्यात ‘बघतोस काय मुजरा कर’ या मराठी चित्रपटातील कलाकारांचे

पुणे : प्रचंड उत्सुकता, विद्यार्थ्यांच्या नजरा कॉलेजच्या प्रवेशद्वाराकडे, तेवढ्यात ‘बघतोस काय मुजरा कर’ या मराठी चित्रपटातील कलाकारांचे वाहन येते अन् सुरू होतो ‘जय भवानी जय शिवाजी’ असा जयघोष. त्यासोबत शिट्ट्या, कलाकारांची छबी टिकण्यासाठी कॅमेऱ्यांचा क्लिकक्लिकाट. हा रोमांचकारी अनुभव होता सूर्यदत्ता इन्स्टिट्यूटमध्ये.अभिनेता व दिग्दर्शक हेमंत ढोमे, अक्षय टांकसाळे, अनिकेत विश्वासराव यांना पाहण्यासाठी कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी एकच कल्ला केला. सूर्यादत्ता कॉलेजमध्ये ‘सूर्याेत्सवा’ची धम्माल मस्ती सुरू आहे. त्यात या कलाकारांनी उपस्थित राहत चार चाँद लावले.संस्थेच्या वतीने संचालिका सुषमा चोरडिया यांनी चित्रपटाचे लेखक व दिग्दर्शक हेमंत ढोमे यांचा, तर प्रा. शेटे यांनी अनिकेत विश्वासराव, अक्षय टांकसाळे व इतर कलाकारांचा सत्कार केला. विद्यार्थ्यांनी कलाकारांशी प्रश्नोत्तररुपी संवाद साधला. हेमंत ढोमे म्हणाले, ‘‘चित्रपटात खलनायकी भूमिका मी करणार नव्हतो. पण, ही भूमिका करणाऱ्या अभिनेत्याचा अचानक अपघात झाला व इतर कलाकारांच्या तारखा न जुळल्यामुळे माझा पर्याय वापरावा लागला व तो प्रेक्षकांनी  वाह वाहची दाद देत स्वीकारला. यापुढेही अशा भूमिका करण्याचा प्रयत्न करेल. आपण सर्वांनी गडकिल्ल्यांची स्वच्छता व संवर्धन करण्याची काळजी घ्यावी, असे आवाहन केले.’’संस्थेच्या पाचवी व सहावीच्या मुलांनी कलाकारांसोबत सिंहगड स्वच्छता मोहिमेत सहभागी होत कलाकारांची कौतुकाची थाप मिळवली.  कार्यक्रमाच्या शेवटी कलाकारांसोबत काही विद्यार्थ्यांनी चित्रपटातील ‘कोंबडा’ गाण्यावर नृत्य केले. संदीप वानखेडे यांनी सूत्रसंचालन केले.(प्रतिनिधी)ऐतिहासिक कलाकृतीमागे समाजाने उभे राहावे पुणे : ‘जय भवानी, जय शिवाजी’ अशा घोषणा, टाळ्यांच्या कडकडाटात ‘बघतोस काय मुजरा कर’ या मराठी चित्रपटाचा आनंद रसिकांनी घेला. निमित्त होते लोकमत व सूर्यदत्ता इन्स्टिट्यूट आयोजित ‘बघतोस काय मुजरा कर’ या चित्रपटाच्या खास शोचे. कोथरूडमधील सिटी प्राईड येथे चित्रपटाचा शो झाला. या खास शोला प्रेक्षकांनी प्रचंड उत्साहात प्रतिसाद दिला. ऐतिहासिक कलाकृतींना समाजाचा पाठिंबा मिळावा, अशी अपेक्षा चित्रपटाचे लेखक-दिग्दर्शक हेमंत ढोमे यांनी व्यक्त केली. कलाकारांना भेटून ही रसिकांनी चित्रपटात गडकिल्ल्यांबद्दलच्या समस्यांचे वास्तव चित्रण केले. त्यामुळे टीमचे आभार मानले व चित्रपटाचे कौतुक पण केले. या वेळी सूर्यादत्ता इन्स्टिट्यूटचे संजय चोरडिया व सुषमा चोरडिया यांनी कलाकारांचे स्वागत केले. चित्रपटातील कलाकारांनी सूर्यादत्ता व लोकमत सखी मंचच्या या उपक्रमाचे विशेष कौतुक करत अशा सामाजिक, ऐतिहासिक कलाकृतींमागे उभे राहण्यासाठी संस्थांनी समोर यावे, असे आवाहन केले. सूर्याेत्सव आमच्याकडे विविध खेळ, डान्स स्पर्धा, फेब्रुवारीमधील स्पेशल सर्व डे यांसारख्या कार्यक्रमांनी साजरा होतो. या टीमने चित्रपटाच्या माध्यमातून चांगला संदेश लोकांपर्यंत पोहोचवला आहे. कॉलेजमार्फतही आम्ही अनेक गडांवर स्वच्छता मोहीम राबवणार आहोत.- सुषमा चोरडिया, संचालिका, सूर्यदत्ता इन्स्टिट्यूट