शनिवारी (दि.१३) दुपारी १२चा सुमारास तेजल बालघरे हिने मोबाइलवरून तिचा नवरा किरण विठ्ठल बालघरे यांना फोन करून मला जगायचे नाही, मला आत्महत्या करायची आहे, असे म्हणाली. त्यावेळी किरण बालघरे हे मंचर (ता.आंबेगाव) येथे होते. त्यांनी त्यांचे नातेवाईक दत्तात्रय बाळकृष्ण कोकणे यांना फोेन करून हा प्रकार कळविला. कोकने हे बालघरे यांच्या सदनिकेवर आले असता, दरवाजा उघडा होता, तर तेजल हिची मुले मोठमोठ्याने रडत होते. बालघरे यांनी आत जाऊन पाहिले असता, बेडरूमचा दरवाजा उघडा होता, तर तेजलने ओढणीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. याबाबत तेजलचे वडील लक्ष्मण गोविंद जरे (वय ७० रा.वाकी बुद्रुक जरेवस्ती) यांनी खेड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पुढील तपास पोलीस हवालदार अमोल वंजारी करत आहे.
विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:12 IST