शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणच्या वरिष्ठ तंत्रज्ञाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:13 IST

धायरी : सिंहगड रस्ता परिसरातील नऱ्हे-धायरी येथील महावितरणच्या कार्यालयात एका वरिष्ठ तंत्रज्ञाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. उमेश प्रकाश ...

धायरी : सिंहगड रस्ता परिसरातील नऱ्हे-धायरी येथील महावितरणच्या कार्यालयात एका वरिष्ठ तंत्रज्ञाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. उमेश प्रकाश दीक्षिवंत (वय ३२, रा. फिनोलेक्स कॉलनी, काळेवाडी, पिंपरी-चिंचवड, पुणे) असे आत्महत्या केलेल्या महावितरण कर्मचाऱ्याचे नाव आहे.

सिंहगड रस्ता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उमेश दीक्षिवंत हे महावितरणच्या धायरी शाखेत कार्यरत होते. सध्या त्यांची रात्रपाळीत ड्युटी असल्याने ते नेहमीप्रमाणे शनिवारी रात्री ११ वाजता कामावर हजर झाले होते. नेहमीप्रमाणे इतर कर्मचारी कामात मग्न असताना दीक्षिवंत हे कार्यालयाशेजारी असणाऱ्या गोडावूनमध्ये गेले. सकाळी सातच्या दरम्यान एक कर्मचारी गोडाऊनमध्ये काही कामानिमित्त जात असताना त्याना आतून दरवाजा बंद असल्याचे लक्षात आले. त्यावेळी त्यांनी आवाज दिला असता दीक्षिवंत यांनी कोणताही प्रतिसाद न दिल्याने त्यांच्या सहकाऱ्याने खिडकीतून पाहिले असता त्यांनी गळफास घेतल्याचे दिसून आले. कर्मचाऱ्यांनी तातडीने वरिष्ठांना याबाबत माहिती कळविली. त्यानंतर पोलीस व अग्निशमन दलाच्या जवानांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता त्यांनी छताला असणाऱ्या लोखंडी अँगलला नायलॉन दोरीच्या साहाय्याने गळफास घेतल्याचे आढळून आले. याबाबत सिंहगड रस्ता पोलीस अधिक तपास करीत आहेत.

----------------

मुलीचा पहिला वाढदिवस अन‌् वडिलांची आत्महत्या

मूळचे उस्मानाबाद जिल्ह्यातील असणारे उमेश दीक्षिवंत हे कोल्हापूरवरून मागील दोन वर्षांपूर्वी बदली होऊन महावितरणच्या धायरी शाखेत रुजू झाले होते. मनमिळावू स्वभावाचे असणारे दीक्षिवंत यांचे दोन वर्षांपूर्वी लग्न झाले असून, ते काळेवाडी परिसरात आपल्या पत्नीसमवेत राहत होते. त्यांना एक वर्षाची मुलगी असून तिचा आज पहिला वाढदिवस होता. मुलीच्या वाढदिवशी दीक्षिवंत यांनी आत्महत्या केल्याने कर्मचाऱ्यांनी हळहळ व्यक्त केली. त्यांनी आत्महत्या करण्याइतके टोकाचे पाऊल का उचलले याचे कारण अद्याप समजू शकले नाही.

--------------------

फोटो: उमेश दीक्षिवंत