भिगवण : शाळेचा पेपर अवघड गेला म्हणून १२ वीत शिकणाऱ्या मुलीने वडिलांच्या नावाने चिठ्ठी लिहून विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. त्यामुळे पोंधवडी परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली.भैरवनाथ विद्यालय भिगवण या शाळेत शिकणाऱ्या हरतालिका दतात्रय पवार (वय १७) हिने इंग्रजी आणि बायोलॉजी या विषयात मार्क कमी पडतील. या भीतीने विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. याबाबत भिगवण पोलीस ठाण्यात वडील दतात्रय संपत पवार यांनी बेपत्ता झाल्याची फिर्याद दिली होती. या मध्ये इंग्रजी विषयाचा पेपर झाल्यापासून मुलगी हरतालिका कोणाशी बोलत नव्हती. दि. १ मार्च रोजी घरातून अचानक निघून गेल्याची फिर्यादीत नोंद केली होती. तसेच तिचा शोध गावकरी आणि नातेवाईक दिवसभर करीत होते. त्यावेळी तिने लिहलेली चिट्ठी मिळून आली. या चिठ्ठीमध्ये आपण रात्रीचा दिवस करून अभ्यास केला. तरीही माझ्या आठवणीत राहत नाही. मी पास होऊ शकत नसल्याने मी आत्महत्या करीत आहे, असे लिहिले आहे. त्यानंतर आसपासच्या शेतात, विहिरींचा शोध घेतला असता जवळच्या शेतकऱ्याच्या विहिरीत तिचा मृतदेह मिळून आला. (वार्ताहर)
पेपर अवघड गेल्याने केली आत्महत्या
By admin | Updated: March 2, 2015 23:27 IST