शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

आजही हुंड्यासाठी आत्महत्या

By admin | Updated: April 16, 2016 03:56 IST

सासरच्या जाचाला कंटाळून दोन वर्षांत शहरामध्ये ४० नवविवाहितांनी आत्महत्या केल्या आहेत. यात २०१४मध्ये २६ विवाहिता, तर २०१५ मध्ये १४ विवाहितांनी आत्महत्या केल्या

पिंपरी : सासरच्या जाचाला कंटाळून दोन वर्षांत शहरामध्ये ४० नवविवाहितांनी आत्महत्या केल्या आहेत. यात २०१४मध्ये २६ विवाहिता, तर २०१५ मध्ये १४ विवाहितांनी आत्महत्या केल्या आहेत. या वर्षीही २०१६मध्ये विवाहितांच्या अत्याचाराचा आलेख चढता असून, गेल्या तीन महिन्यांत सहा विवाहितांनी आत्महत्या केल्या. निगडी व पिंपरी पोलीस स्टेशनमध्ये सर्वाधिक विवाहितांच्या आत्महत्येची नोंद आहे.परिमंडळ तीनच्या हद्दीत येणाऱ्या पिंपरी, भोसरी, निगडी, चिंचवड, एमआयडीसी, चतु:शृंगी, हिंजवडी, सांगवी, वाकड या पोलीस ठाण्यांमध्ये दर आठवड्यात विवाहितेच्या अत्याचारासंदर्भात किमान एक तरी गुन्हा दाखल होत आहे. यामध्ये घर किंवा वाहन खरेदीसाठी माहेरून पैसे आणावे, लग्नात हुंडा दिला नाही म्हणून, लग्नानंतरही हुंड्याची मागणी करणे, लग्नात मानपान दिला नाही, किमती वस्तू दिल्या नाहीत, स्वयंपाक व्यवस्थित येत नाही आणि चारित्र्याचा संशय या कारणावरून विवाहितांचा छळ होत असल्याच्या तक्रारी पोलीस ठाण्यांमध्ये दाखल आहेत. यात सर्वाधिक आत्महत्येची नोंद निगडी पोलीस ठाण्यात झाल्या आहेत.दरम्यान, मागील आठवड्यातच मोशी येथे एका बावीसवर्षीय विवाहितेने घरगुती झालेल्या भांडणाच्या कारणावरून गळफास घेऊन आत्महत्या केली. तर चार दिवसांपूर्वीच एका ३२वर्षीय विवाहितेने लग्नात हुंडा दिला नाही म्हणून सासरच्या मंडळींकडून वारंवार पैशांची मागणी होत असल्याची तक्रार निगडी ठाण्यात दिली आहे. मूल होत नसल्याने आत्महत्या मोशी येथे मागील आठवड्यात विवाहितेला मूल होत नसल्याने पतीसह सासरच्या मंडळींकडून विवाहितेचा छळ सुरू होता. या छळाला कंटाळून २१वर्षीय विवाहितेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. तर पंधरा दिवसांपूर्वी मोशी येथे विवाहितेला दोन मुली होत्या. मुलगा होत नसल्याच्या कारणावरून सासरच्या मंडळींनी विवाहितेला विष पाजून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली. दरम्यान सासरच्या मंडळींकडून विवाहितांना विविध वस्तूंची रोख पैशांच्या स्वरूपातही मागणी केली जात आहे. ती पूर्ण न केल्यास शारीरिक व मानसिक छळ केला जात आहे. त्यातूनच आत्महत्येसारख्या घटनांत वाढ होत आहे. या घटना वेळीच रोखण्यासाठी विवाहितेने संबंधितांवर तत्काळ तक्रारी दाखल करणे गरजेचे आहे.(प्रतिनिधी)मुलीचा छळ पाहून पित्याची आत्महत्या मागील महिन्यात मोशी येथे विवाहितेला सासरच्या मंडळींकडून घर घेण्यासाठी पैशांची मागणी करण्यात येत होती. यासाठी सासरच्यांनी विवाहितेला माहेरी पाठवून दिले होते. जोपर्यंत घर घेण्यासाठी माहेरून पैसे आणत नाही, तोपर्यंत सासरी न येण्याची धमकी विवाहितेला दिली होती. अशा प्रकारे मुलीचा होणारा छळ आणि मुलीच्या सुखासाठी पैसे देण्याची परिस्थिती नसल्याने पित्यानेच राहत्या घरात आत्महत्या केल्याची घटना घडली. या घटनेमुळे सासरच्या मंडळींवर गुन्हा दाखल होऊनही आरोपी मात्र मोकाटच आहेत.आजच्या स्पर्धेच्या युगात महिलांनी सर्वच क्षेत्रांत पुरुषांच्या बरोबरीने प्रगती केली आहे. असे असताना हुंड्याच्या मागणीसाठी व इतर किरकोळ कारणांवरून विवाहितांचा पतीकडून, सासरच्या मंडळींकडून मानसिक छळ होणे, ही वाईट गोष्ट आहे. या छळाला कंटाळून काही महिला पोलिसांत तक्रार देतात, तर काही आत्महत्या करण्यापर्यंत टोकाची भूमिका घेतात. विवाहितांनी टोकाची भूमिका घेण्याआधी पोलिसांत तक्रार द्यावी. या तक्रारी सोडविण्यासाठी पोलीस मित्र नावाचे मंडळ कार्यरत असून, या मंडळात विविध क्षेत्रांतील महिला सदस्य आहेत. तक्रार दाखल केल्यानंतर या मंडळामार्फत विवाहितांच्या घरातील वाद, मतभेद सोडविण्याचा प्रयत्न केला जात असतो. गेल्या काही महिन्यांत अनेक विवाहितांच्या समस्या या मंडळामार्फत सोडविल्या गेल्या आहेत.- रत्नमाला सावंत, पोलीस उपनिरीक्षक, पिंपरी