शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

पुरंदर विमानतळाच्या धसक्याने केली आत्महत्या

By admin | Updated: April 11, 2017 03:43 IST

पुरंदर तालुक्यात होऊ घातलेल्या विमानतळासाठी आपली संपूर्ण जमीन जाऊन आपण उघड्यावर येणार असल्याच्या धास्तीने शंकर दौलती मेमाणे (वय ७७, रा. पारगाव मेमाणे,

जेजुरी : पुरंदर तालुक्यात होऊ घातलेल्या विमानतळासाठी आपली संपूर्ण जमीन जाऊन आपण उघड्यावर येणार असल्याच्या धास्तीने शंकर दौलती मेमाणे (वय ७७, रा. पारगाव मेमाणे, भगतवस्ती, ता. पुरंदर) यांनी विषारी औषध पिऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ६ एप्रिल रोजी दुपारी १ वाजता राहत्या घरी त्यांनी गोचीड मारण्याचे औषध प्यायले होते. थोड्या वेळाने त्यांना चक्कर आल्यानंतर कुटुंबीयांनी त्यांना सासवड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथून त्यांना ससून येथे हलवण्यात आले होते. मात्र, तेथेही अत्यावश्यक सेवेत जागा नसल्याने पिंपरी-चिंचवड येथील यशवंतराव चव्हाण हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले होते. ८ एप्रिल रोजी सायंकाळी ६.३० वाजता त्यांचा मृत्यू झाला. पुरंदर तालुक्यात होऊ घातलेल्या विमानतळासाठी त्यांची जमीन जाणार असल्याने ते गेल्या अनेक महिन्यांपासून दडपणाखाली होते. दररोज वर्तमानपत्रे घेऊन विमानतळासंबंधातील बातम्यांची कात्रणे करीत होते. विमानतळाबाबत जेथून काही माहिती उपलब्ध होईल ती माहिती मिळवण्याचा प्रयत्न करीत होते. आयुष्यात जे कमावले ते जाणार या धास्तीने ते प्रचंड दडपणाखाली होते. यामुळेच त्यांनी आत्महत्या केली असल्याचे त्यांचे बंधू अंकुश दौलती मेमाणे, मुले शिवाजी शंकर मेमाणे व रामदास शंकर मेमाणे यांनी सांगितले. घटनेची आपण सखोल चौकशी करणार असल्याचे जेजुरी पोलीस ठाण्याचे स.पो.नि. रामदास वाकोडे यांनी सांगितले.