शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

वरिष्ठाच्या जाचाला कंटाळून आत्महत्या

By admin | Updated: October 7, 2016 03:02 IST

डीएचएफएल या फायनान्स कंपनीमध्ये क्रेडिट मॅनेजरपदावर काम करणाऱ्या एका विवाहितेने तिच्या वरिष्ठाच्या मानसिक छळाला कंटाळून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना

पुणे : डीएचएफएल या फायनान्स कंपनीमध्ये क्रेडिट मॅनेजरपदावर काम करणाऱ्या एका विवाहितेने तिच्या वरिष्ठाच्या मानसिक छळाला कंटाळून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना पुण्यातील वारज्यामध्ये घडली. या विवाहितेच्या मोबाईलवर तिच्या वरिष्ठाने पाठवलेले अश्लील मेसेज पतीने मोबाईलसह पोलिसांच्या ताब्यात दिले आहेत. विशेष म्हणजे, गेल्याच महिन्यात तिने पतीला आपल्याला मानसिक त्रास होत असल्याने नोकरी सोडणार असल्याचे सांगितले होते. तब्बल एक महिन्यानंतर हे प्रकरण समोर आले असून, वारजे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.अश्विनी महेंद्र पाटील (वय ३२, रा. प्रियदर्शनी विहार, वारजे) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी सूरज बुंदेले (पूर्ण नाव, पत्ता नाही) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी महेंद्र अशोक पाटील (वय ३५) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अश्विनी यांचे पती महेंद्र पाटील हे धनकवडी येथील एका खासगी संगणक कंपनीमध्ये नोकरी करतात, तर अश्विनी या डीएचएफएल कंपनीमध्ये क्रेडिट मॅनेजर म्हणून नोकरी करीत होत्या. आरोपी बुंदेले हा अश्विनी यांच्या कंपनीतील वरिष्ठ आहे. ८ सप्टेंबर रोजी रात्री साडेआठच्या सुमारास बेडरूममध्ये अश्विनी यांनी पंख्याला दोरीच्या साह्याने गळफास घेतल्याचे दिसले. त्यानंतर पाटील यांनी पत्नीचा मोबाईल तपासला असता त्यामध्ये सूरज बुंदेलेने अश्विनी यांना वारंवार फोन करून त्रास दिल्याचे समोर आले. (प्रतिनिधी)विवाहितेचा मानसिक छळ : मोबाईलवर अश्लील मेसेज४बेडजवळ त्यांना अश्विनी यांनी लिहून ठेवलेली चिठ्ठी मिळाली. त्यामध्ये ‘मी अश्विनी महेंद्र पाटील स्वखुशीने फाशी घेत आहे, यात माझ्या घरच्यांचा, कुटुंबीयांचा काही दोष नाही. हीच विनंती आहे, की त्यांना कोणताच त्रास कोणीच देऊ नये,’ असे लिहून ठेवलेले होते. महेंद्र यांनी ही चिठ्ठी व मोबाईल पोलिसांच्या ताब्यात दिला. ससून रुग्णालयात शवविच्छेदन झाल्यावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. ४दु:खातून तसेच मानसिक धक्क्यामधून सावरलेले पाटील यांनी बुधवारी रात्री वारजे पोलिसांकडे जाऊन फिर्याद दाखल केली.