शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

उसाचे पाचट शेतात कुजविणे ठरते फायदेशीर

By admin | Updated: July 24, 2015 04:37 IST

जमिनीची सुपिकता टिकवून ठेवण्यासाठी सेंद्रिय खतांची नितांत गरज आहे. त्यासाठी लागणारे शेणखत कमी पडू लागले आहे. यावर शेतकऱ्यांकडे उसाचे

महेश जगताप (सोमेश्वरनगर)जमिनीची सुपिकता टिकवून ठेवण्यासाठी सेंद्रिय खतांची नितांत गरज आहे. त्यासाठी लागणारे शेणखत कमी पडू लागले आहे. यावर शेतकऱ्यांकडे उसाचे पाचट कुजविणे हा अत्यंत सोपा पर्याय आहे, मात्र गैरसमजापोटी अनेक शेतकरी पाचट पेटवून देत आहेत. मात्र शेतकऱ्यांनी पाचटाचे महत्त्व समजून घेऊन ते शेतातच कुजविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. सेंद्रिय पदार्थांवर जमिनीची सुपिकता अवलंबून असते. परंतु, रासायनिक खते, पाण्याचा अतिवापर, औषधांच्या अमर्याद वापरामुळे जमिनी क्षारपड आणि चोपण होत चालल्या आहेत. त्यामुळे सेंद्रिय खतांचा वापर करून त्या सुधारण्याशिवाय आता शेतकऱ्यांकडे पर्याय उरला नाही. सेंद्रिय पदार्थांमुळे जमिनीतील अन्नघटक पिकास योग्य प्रकारे घेता येतो. जमीन भुसभुशीत होऊन जिवाणूंची संख्याही वाढते. परिणामी उत्पादनात वाढ होऊन शेतकऱ्यांना आर्थिक फायदाच होतो. अलीकडच्या काळात शेणखत आणि कंपोस्ट खताचा तुटवडा भासू लागला आहे. तसेच रासायनिक खतांचे दरही गगनाला भिडले आहेत. त्यामुळे उसाचे पीक तुटून गेल्यावर विनापैशाचे सेंद्रिय खत शेतकऱ्यांच्या रानात पडून असते. शेतकरी मात्र ते कुजविण्याऐवजी थेट उसाच्या पाचटाला काडी लावून देतो. त्यामुळे तो चांगले सेंद्रिय खतच नष्ट करतो. त्याऐवजी पाचट नांगरट करून कुजविणे किंवा त्याची पाचट कुटी करून खत तयार करणे शेतकऱ्यांचा फायद्याचे आहे. तसेच रानातच पाचट ठेवल्यामुळे त्याचे अनेक फायदे शेतकऱ्याला होतात. पाचटाचा जमिनीला आच्छादन म्हणून उपयोग होतो. आच्छादनामुळे पाण्याच्या बाष्पीभवनाचा वेग कमी होतो, शिवाय ऊसपिकास बऱ्याच काळापर्यंत मुळांजवळ पाण्याचा ओलावा राहतो. पाचट विघटनातून निर्माण होणाऱ्या सेंद्रिय पदार्थांमुळे जमिनीची जलधारण क्षमता वाढते. तसेच जमिनीचा कसही वाढतो. उसापासून साखर तयार होते. साखरेत सुक्रोज असते, सुक्रोजमध्ये कार्बन, हायड्रोजन व आॅक्सिजन ही मूलद्रव्ये असतात. याचाच अर्थ उसासाठी वापरलेले नत्र, स्फुरद व पालाश ही मूलद्रव्ये साखरेत येत नाहीत. कारण ही बहुतांश मूलद्रव्ये साखरेत असतात. हे पाचट पुन्हा रानातच राहते. सर्वसाधारण एक हेक्टर उसापासून आठ ते दहा टन पाचट मिळते. त्यामध्ये ३५ किलो नत्र, १३ किलो स्फुरद व ६५ किलो पालाश असते. मग हे पाचट जाळून शेतकरी अमूल्य अशी मूलद्रव्ये नष्ट करत असतो. आता रासायनिक खतांच्या किमती भरमसाट वाढल्या आहेत.