शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

उसाच्या एफआरपीची मोडतोड होऊ देणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : ऊस उत्पादकांना त्यांच्या उसाची रास्त किंमत तीन हप्त्यांत द्यावी, असा केंद्र सरकारचा विचार आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : ऊस उत्पादकांना त्यांच्या उसाची रास्त किंमत तीन हप्त्यांत द्यावी, असा केंद्र सरकारचा विचार आहे. त्यावर राज्याला शिफारस करायची आहे. आम्ही असा निर्णय होऊ देणार नाही. वेळ पडल्यास राज्यव्यापी आंदोलन करू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला.

साखर आयुक्त शेखर गायकवाड यांना शेट्टी यांनी यासंदर्भात बुधवारी (दि. ३०) निवेदन दिले. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. निती आयोगाने तीन हप्त्यांची शिफारस केल्याचे शेट्टी म्हणाले. त्यांनी सांगितले की, अशा हप्त्यांमधून शेतकऱ्याचे त्यावर्षीचे पीक कर्ज फिटणार नाही. त्यामुळे त्याला १२ टक्के दराने व्याज द्यावे लागेल. सध्या एकरकमी एफआरपी द्यावी लागते तेच योग्य आहे.

साखरेची किमान किंमत ३१ रुपये किलो कायद्याने निश्चित केली. आता दूध तसेच सर्वच शेती उत्पादनांबाबत सरकारने हीच पद्धत अवलंबावी, अशी मागणी शेट्टी यांनी केली. परप्रांतीय धनदांडगे व्यापारी शेतमाल खरेदी करून नंतर पैसे देत नाहीत. त्यांच्याविरोधात दाद मागणारी तरतूदच केंद्र सरकारच्या नव्या शेती कायद्यात नाही. ५ कोटी बुडवायचे व २ वर्षे कैद घेऊन ते पचवायचे हे बंद व्हावे. त्यासाठी राज्याने कायदा करावा. केंद्राच्या कायद्यात घाईने दुरुस्ती करू नये. शेतकऱ्यांचे मत विचारावे. दोन दिवसांच्या अधिवेशनात ही दुरुस्ती नको, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली असल्याचे शेट्टी म्हणाले. दिल्लीतील ७ महिन्यांच्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा असल्याचा ठराव राज्य अधिवेशनात मंजूर करावा अशीही मागणी मुख्यमंत्र्यांकडे केल्याचे त्यांनी सांगितले.

चौकट

संचालक व्हायचे तर

साखर कारखान्यासाठी शेतकऱ्यांवर जादा भागभांडवलाचा बोजा टाकण्याऐवजी कारखान्याचे संचालक व्हायचे असेल तर २५ लाख भागभांडवल व २५ लाख कारखान्याकडे ठेव स्वरूपात, मुदत संपली की ते परत असा नियम व्हावा असे राजू शेट्टी म्हणाले. १५ हजार रुपयांचे भाग घेऊन ३०० कोटी रुपयांचे मालक व्हायचे धंदे आता बास करायला हवेत असे त्यांनी सांगितले.