शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात १२ लाख ८७ हजार टन उसाचे गाळप

By admin | Updated: November 22, 2014 00:37 IST

अवकाळी पावसाच्या फटक्यानंतर जिल्ह्यातील साखर कारखान्यांचे गाळप आता पूर्वपदावर आले आहे.

सोमेश्वरनगर : अवकाळी पावसाच्या फटक्यानंतर जिल्ह्यातील साखर कारखान्यांचे गाळप आता पूर्वपदावर आले आहे. जिल्ह्यातील कारखान्यांनी मिळून १२ लाख ८७ हजार ५२ टन उसाचे गाळप करून १२ लाख ४५ हजार ६५५ पोत्यांचे उत्पादन घेतले आहे. मात्र, अवकाळी पावसाने व्यत्ययाने थंडीचे प्रमाण नसल्याने साखरउतारा अजून दहा टक्क्यांवरच घुटमळत आहे. जिल्ह्यातील भीमा पाटस व राजगड कारखान्यांची धुराडी अजून बंदच आहेत. या वर्षी साखर कारखान्यांचे हंगाम सुरू होण्याअगोदर कारखान्यांपुढे अनेक विघ्ने उभी राहिली होती. ऊसतोडणी वाहतूकदार संघटनांनी आपल्या विविध मागण्यांसाठी संप पुकारला होता. त्यामुळे कारखाने जोमाने सुरू होण्यासाठी १० नोव्हेंबर उजाडला. चालू महिन्यात अवकाळी पावसामुळे थंडीच गायब झाल्याने कारखान्यांना साखर उतारा मिळत नसल्याचे चित्र आहे. नोव्हेंबर ते जानेवारी हा साखर धंद्यातील ‘हाय रिकव्हरी पिरेड’ म्हणून ओळखला जातो. मात्र, अजूनही साखर कारखान्यांचे सरासरी साखरउतारे दहा टक्क्यांवरच घुटमळत आहेत. १५ कारखान्यांपैकी भीमा पाटस, राजगड कारखाने वगळता उर्वरित १३ कारखान्यांमध्ये गाळपाच्या व साखर उत्पादनाच्या बाबतीत सहकारी साखर कारखान्यांच्या पुढे खासगी कारखाने गेले आहेत. बारामती अ‍ॅग्रो कारखान्याने १ लाख ९२ हजार ७९० टन उसाचे गाळप करून २ लाख २ हजार ६५० पोत्यांचे उत्पादन घेत पहिल्या स्थानावर आहे. तर १ लाख ६४ हजार १०० टन उसाचे गाळप करून १ लाख ५५ हजार ८०० पोत्यांचे उत्पादन घेत विघ्नहर दुसऱ्या स्थानावर, तर १ लाख ९ हजार ७८० टन उसाचे गाळप करून १ लाख ११ हजार ६०० पोत्यांचे उत्पादन घेत दौंड शुगर तिसऱ्या स्थानावर आहे. सरासरी साखर उताऱ्यातही ११.२ टक्क्यांचा उतारा ठेवत बारामती अ‍ॅग्रोने आघाडी घेतली आहे. (वार्ताहर)