शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

शिरूर तालुक्यात यंदा पुरेसा पाणीसाठा

By admin | Updated: May 7, 2014 04:25 IST

मे महिना उजाडला असला, तरी सुदैवाने शिरुर तालुक्यात अद्याप पाणी टँकरचा एकही प्रस्ताव नसल्याचे चित्र आहे.

शिरूर : मे महिना उजाडला असला, तरी सुदैवाने तालुक्यात अद्याप पाणी टँकरचा एकही प्रस्ताव नसल्याचे चित्र आहे. मागील वर्षात मात्र ११ गावे १४८ वाड्यांना २९ टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागला होता. तालुका तसा २००५पासून बर्‍यापैकी टँकरमुक्त झाला आहे. मात्र, २०१२मधील कमी पर्जन्यमानामुळे २०१३मध्ये पाण्याची टंचाई भासली आणि पर्यायाने ११ गावे १४८ वाड्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागला. २०१३मध्ये मात्र सरासरी पाऊस झाल्याने पाण्याची टंचाई दूर झाली. धरणे भरल्याने धरणांचे पाणीही मिळाले. याचा परिणाम होऊन या वर्षी मे महिना उजाडला, तरी टँकरचा प्रस्ताव नसल्याचे पंचायत समितीच्या सूत्रांनी सांगितले. तालुक्याची दुष्काळी ओळख २००५मध्ये पुसली गेली. कारण चासकमान, डिंभे प्रकल्पाचे पाणी तालुक्याला मिळाले. त्याआधी अवर्षणप्रवण क्षेत्र म्हणून गणल्या जाणार्‍या या तालुक्याला पावसाच्या पाण्यावरच अवलंबून राहावे लागत होते. २००२ ते २००४चा दुष्काळ हा १९७२पेक्षा भयाण होता, असे दुष्काळ भोगलेली माणसे सांगतात. सुदैवाने २००४, २००५मध्ये चांगला पाऊस झाला. प्रकल्पांचे पाणी मिळाले. तालुका दुष्काळमुक्त झाला. धरणांत पाणी कमी असले व पाऊसही अत्यल्प झाल्यास दुष्काळाला सामोरे जावे लागते. प्रकल्पांचा लाभ मिळत नसणार्‍या पश्चिम भागातील काही गावे मात्र आजही पावसाच्या पाण्यावरच अवलंबून आहेत. मागील वर्षी धरणे पूर्ण क्षमतेने भरली नाहीत. मात्र, आवर्तने मिळालेली गावे वगळता तालुक्यातील ११ गावे १४८ वस्त्यांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागले. सुदैवाने या वर्षी मे उजाडला, तरी या भागातील एकही प्रस्ताव (टँकरसाठी) नाही. केवळ वाडापुनर्वसन येथील विहीर अधिग्रहणसंदर्भातला प्रस्ताव झाला आहे.