शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

बँक फ्रॉड प्रकरणी सुधीर भटेवरा याला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:13 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : नामांकित बँकेमधील डारमेंट खात्याचा डेटा प्रकरणात सायबर पोलिसांनी पळून गेलेल्या सुधीर भटेवरा ऊर्फ जैन ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : नामांकित बँकेमधील डारमेंट खात्याचा डेटा प्रकरणात सायबर पोलिसांनी पळून गेलेल्या सुधीर भटेवरा ऊर्फ जैन याला अटक केली आहे. न्यायालयाने अधिक तपासासाठी त्याला २४ मार्चपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे. या प्रकरणात आतापर्यंत १४ जणांना अटक केली आहे.

सुधीर शांतीलाल भटेवरा (वय ५४, रा. एम्पायर सोसायटी, आनंदनगर, सिंहगड रोड) असे अटक केलेल्याचे नाव आहे. अनघा मोडक तसेच औरंगाबाद येथील राजेश शर्मा आणि परमजितसिंग संधु हे सुधीर भटेवरा याच्या घरी १५ मार्च रोजी रात्री आले होते. शर्मा आणि संधु यांच्यासाठी भटेवरा याने २५ लाख रुपयांची सोय केली होती. पोलिसांनी या सर्वांना ताब्यात घेऊन २५ लाख रुपये जप्त केले होते. यावेळी सुधीर भटेवरा याला चौकशीसाठी बोलावल्यास हजर राहण्याची ४१ नुसार नोटीस दिली होती. मात्र, सुधीर भटेवरा हा पळून गेला होता. त्यामुळे सायबर पोलिसांनी रविवारी रात्री त्याला अटक केली.

पोलिसांनी सुधीर भटेवरा याच्याबरोबर इतर १३ आरोपींना आज न्यायालयात हजर केले होते. सरकारी वकील अ‍ॅड. ज्ञानेश्वर मोरे यांनी सांगितले की, सुधीर भटेवरा याच्याकडून २५ लाख रुपये जप्त केले आहे. ते त्याने कोणाकडून आणले, त्याच्या मोबदल्यात त्याला इतर आरोपींकडून कोणता डेटा मिळणार होता. राजेश शर्मा आणि परमजितसिंग संधु यांच्याशी त्याचा संपर्क कसा झाला. त्यांना मिळालेल्या बँक खात्यांचा डेटाचा ते पैसे काढण्यासाठी कसा उपयोग करणार होते, याचा तपास करायचा असल्याचे सांगितले. त्यानंतर न्यायालयाने भटेवरा याला २४ मार्चपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली. त्याचबरोबर अन्य १३ आरोपींना न्यायालयीन कोठडी मंजूर केली. हा सर्व क्लिष्ट तपास आहे. या खात्यांबाबत बँकांकडून माहिती आली आहे. ती पडताळून पाहून त्यात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास सुरु असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार वाघचवरे यांनी सांगितले.