शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

पीएमपीवर अचानक टोलधाड

By admin | Updated: May 3, 2015 05:59 IST

गावकरी, टोलनाका व्यवस्थापन आणि पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपी) अधिकाऱ्यांमध्ये झालेल्या चर्चेतून पीएमपीला खेड-शिवापूर

पुणे : गावकरी, टोलनाका व्यवस्थापन आणि पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपी) अधिकाऱ्यांमध्ये झालेल्या चर्चेतून पीएमपीला खेड-शिवापूरटोलनाक्यावर टोलमधून सूट देण्याचा निर्णय झाला. त्यानुसार मागील साडे चार वर्षे पीएमपी बसचा टोल घेण्यात आला नाही. मात्र, टोल व्यवस्थापनाने अचानक या काळातील सुमारे ५२ लाख ४६ हजार रुपयांचे बिल पीएमपीला पाठविले आहे. त्यामुळे पीएमपी प्रशासनही या टोलधाडीमुळे गोंधळात पडले आहे.पीएमपीच्या शहराबाहेर जाणाऱ्या काही बसेसला टोल भरावा लागतो. सध्या यामध्ये तळेगाव ढमढेरे व त्या बाजूला जाणाऱ्या बस, उरुळी कांचन, तळेगाव ढमढेरे, राजगुरुनगर या भागांत जाणाऱ्या बसमार्गांचा समावेश आहे. हा टोल भरण्यासाठी प्रत्येक प्रवाशाकडून तिकिटावर एक रुपया जादा आकारला जातो. काही वर्षांपूर्वी नसरापूरला जाणाऱ्या बसलाही टोल भरावा लागत होता. या मार्गावर कात्रज-नसरापूर (मार्ग क्र. ६१) ही बस अनेक वर्षांपासून धावत होती. मात्र, या बसपासून उत्पन्न कमी मिळत असल्याने ही बस दोन महिन्यांपूर्वी बंद करण्यात आली. तत्पूर्वी साधारणत: नोव्हेंबर २०१० पर्यंत या मार्गावर असलेल्या खेड शिवापूर टोलनाक्यावर पीएमपी प्रशासनाकडून दरमहा सुमारे २४०० रुपयांचा टोल भरला जात होता. मात्र, त्या वेळी टोल व्यवस्थापनाने टोलदरात सुमारे ८ हजार रुपयांपर्यंत वाढ केली. बसपासून मिळणारे उत्पन्न आणि झालेली टोल दर वाढ यामुळे हा मार्ग परवडणारा नसल्याचा निष्कर्ष काढत बंद करण्यात आला.बस बंद झाल्यानंतर, परिसरातील गावकऱ्यांनी टोल व्यवस्थापन; तसेच पीएमपी अधिकाऱ्यांशी चर्चा करून यातून मार्ग काढला. त्यानुसार टोल व्यवस्थापनाने बसला टोल न आकारण्याचे आश्वासन दिले. त्यानुसार कात्रज-नसरापूर बस पुन्हा सुरू करण्यात आली. तेव्हापासून पीएमपीकडून एक रुपयाही टोल घेण्यात आला नाही. टोल व्यवस्थापनाकडूनही कधीही मागणी केली गेली नाही. तसेच, पीएमपीनेही प्रवाशांकडून जादाचा एक रुपया आकारला नाही. फेब्रुवारी महिन्यापर्यंत ही बस सुरू होती. मात्र, फारसे उत्पन्न मिळत नसल्याने बस मार्चमध्ये बंद करण्यात आली. त्यानंतर लगेचच टोल व्यवस्थापनाने नोव्हेंबर २०१० ते फेबु्रवारी २०१५ या कालावधीतील टोलचे ५२ लाख ४६ हजार ८६० रुपये द्यावे, असे पत्र पीएमपीला पाठविले आहे. त्यामुळे प्रशासन गोंधळात पडले आहे.