शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

अशी ही राजकीय घराणी... पवारांची तिसरी पिढी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2019 01:09 IST

राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार गेल्या ५० वर्षांपासून सक्रिय राजकारणात आहेत. आई-वडील शेतकरी कामगार पक्षाचे असले, तरी शरद पवार कायम कॉँग्रेस विचारांचे राहिले.

- अविनाश थोरातराष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार गेल्या ५० वर्षांपासून सक्रिय राजकारणात आहेत. आई-वडील शेतकरी कामगार पक्षाचे असले, तरी शरद पवार कायम कॉँग्रेस विचारांचे राहिले. आमदार ते मुख्यमंत्री आणि केंद्रीय पातळीवरही त्यांनी काम केले आहे. आजपर्यंत त्यांनी १४ सार्वत्रिक निवडणुका लढविल्या असून एकदाही त्यांना पराभव स्वीकारावा लागला नाही. मात्र, कॉँग्रेसपक्षाच्या अध्यक्षपदासाठी १९९७ मध्ये झालेल्या निवडणुकीत त्यांना सीताराम केसरी यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला. वयाच्या २७व्या वर्षी ते मंत्री झाले. ३४व्या वर्षी मुख्यमंत्रिपद मिळविले. १९९९ मध्ये त्यांनी राष्टÑवादी कॉँग्रेसची स्थापना केली.शरद पवार यांचे पुतणे अजित पवार यांनी सक्रिय राजकारणात १९९१ साली प्रवेश केला. पुणे जिल्हा सहकारी बॅँकेचे ते अध्यक्ष बनले. त्याच वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीतही विजयी होऊन खासदार झाले. मात्र, तीन महिन्यांतच शरद पवार यांच्यासाठी लोकसभेची जागा रिकामी करण्यासाठी त्यांनी राजीनामा दिला. ते विधानसभेवर गेले. १९९१ पासून आजपर्यंत ते विधानसभेत आमदार आहेत. या काळात राज्य मंत्रिपदापासून ते उपमुख्यमंत्रिपदापर्यंत अनेक पदे त्यांनी सांभाळली. शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे २००६ मध्ये राज्यसभेवर खासदार म्हणून निवडून गेल्या. २००९ आणि २०१४ मध्ये त्यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदारकीची निवडणूक जिंकली. शरद पवार यांचे थोरले बंधू आप्पासाहेब पवार यांनी बारामती कृषी प्रतिष्ठानची स्थापना केली. आप्पासाहेबांचे पुत्र राजेंद्र पवार सध्या त्याची धुरा सांभाळत आहेत. त्यांनाच राजकारणात शरद पवार यांचे वारसदार म्हणून आणले जाणार होते. परंतु काही कारणाने होऊ शकले नाही, असे म्हणतात, पण त्यांचे पुत्र रोहित पवार यांच्या रूपाने पवार घराण्यातील तिसरी पिढी राजकारणात आली. अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना मावळमधून राष्टÑवादी कॉँग्रेसची उमेदवारी मिळाली आहे. पार्थ यांना आई सुनेत्रा यांच्याकडूनही राजकीय वारसा आहे. त्यांचे मामा पद्मसिंह पाटील हे कॅबिनेट मंत्री होते. त्यांचे मामेभाऊ आणि माजी मंत्री राणा जगजितसिंह यंदा उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातून लढत आहेत.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक