शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

असा झाला रसिलाच्या खुनाचा उलगडा

By admin | Updated: February 2, 2017 03:58 IST

इन्फोसिस कंपनीतील आयटी अभियंता तरुणीचा खून करून पसार झालेल्या भाबेन भराली सैकिया या आरोपीला हिंजवडी पोलिसांनी अवघ्या आठ तासांत जेरबंद केले.

पिंपरी : इन्फोसिस कंपनीतील आयटी अभियंता तरुणीचा खून करून पसार झालेल्या भाबेन भराली सैकिया या आरोपीला हिंजवडी पोलिसांनी अवघ्या आठ तासांत जेरबंद केले. आसाम राज्यातील तखौमपूर जिल्ह्यात तातीबहार या मूळ गावी पळून जाण्यासाठी मुंबईत पोहोचलेल्या आरोपीला पोलिसांनी शिताफीने अटक केली.हिंजवडीतील इन्फोसिस कंपनीत नोकरीस असलेल्या रसिला राजू ओ.पी. (वय २३, रा. हिंजवडी, मूळ रा. केरळ) या तरुणीचा केबलने गळा आवळून खून झाल्याचा प्रकार रविवारी रात्री उघडकीस आला. खून करून पसार झालेल्या कंपनीच्या रखवालदार सैकिया याला हिंजवडी पोलिसांनी सोमवारी पहाटे ३च्या सुमारास मुंबईतून अटक केली. एकटक बघत असल्याची कंपनी व्यवस्थापनाकडे तक्रार करणार, असे तरुणीने म्हटल्यामुळे चिडून रखवालदाराने रसिलाचा खून केला. खुनाची घटना सायंकाळी पाचला घडली. याची माहिती पोलिसांना रात्री दहाच्या सुमारास समजली. माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेरॅतील फुटेज तपासले. त्यात रखवालदाराचा संशयास्पद वावर दिसून आला. पाच वाजता खून केल्यानंतर ड्यूटीची वेळ संपेपर्यंत सायंकाळी सातपर्यंत आरोपी कंपनीच्या आवारातच होता. ड्यूटी संपल्यानंतर तो निघून गेला. सीसीटीव्हीत कैद झालेल्या फुटेजमधील काही दृश्यांचा आधार घेत पोलीस आरोपीजवळ पोहोचले. त्याला नाव, पत्ता विचारला असता, त्याने खोटे नाव सांगितले. उडवाउडवीची उत्तरे देऊ लागल्याने त्याला पोलिसी खाक्या दाखविण्यात आला. त्याने लगेच खुनाची कबुली दिली. त्याला घेऊन पोलीस पथक पुण्यात दाखल झाले. न्यायालयात हजर केल्यानंतर त्याला ५ दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावली आहे. (प्रतिनिधी)- रात्री साडेदहाला आरोपीच्या मागावर पोलीस पथक पाठविले. पुणे रेल्वे स्थानकावर अर्धा तास शोध घेण्याचा प्रयत्न केला. दरम्यान आरोपीच्या मोबाईलचे लोकेशन तपासले असता, तो मुंबईत असल्याचे निदर्शनास आले. तातडीने दुसरे पथक मुंबईला रवाना झाले. पुुणे ते मुंबई हे दीडशे किलोमीटर अंतर पोलिसांनी पावणेदोन तासांत पार केले. सव्वाबाराच्या सुमारास पोलीस पथक सीएसटी रेल्वे स्थानकाजवळ पोहोचले. - आसामला निघून जाण्यासाठी रेल्वे पकडण्याकरिता आरोपी मुंबईत गेला होता. रात्री रेल्वे स्थानकावर संशयास्पदरीत्या वावरणाऱ्या व्यक्तींची माहिती घेत पोलीस आरोपीपर्यंत पोहोचले.त्याला नाव, पत्ता विचारला असता, त्याने खोटे नाव सांगितले. तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागल्याने त्याला पोलिसी खाक्या दाखविण्यात आला. त्याने लगेच खुनाची कबुली दिली.